12-M-aarogya
ब्रोकोली
Category:
लेखसंग्रहब्रोकोलीचा जन्म साधारण दोन हजार वर्षापूर्वी इटलीमध्ये झाला. ब्रोकोली ही हिरव्या रंगाची असते व आपल्या फुलकोबीप्रमाणे दिसते. रोम संस्थानिक ब्रोकोली लावत असत. ब्रोकोलीनंतर इटलीमधून युरोपात आली. व नंतर अमेरिकेकडे वळली. अमेरिकेत गेल्यावर डॉ.जे.टी.स्मिथ यांनी ब्रोकोलीचे संपूर्ण पृथ्थकरण केले व ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त आहे असे जाहीर केले.
पालक
Category:
लेखसंग्रहपालक ही एक सुंदर पालेभाजी आहे. विशेष म्हणजे अगदी हिमालय ते कन्याकुमारी कोठेही पालक होऊ शकतो. ही एक अत्यंत चविष्ठ आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे. केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगाच्या पाठीवर आज पालकला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. फार पूर्वीपासून अरेबियन प्रदेशात पालकला अतिशय महत्त्व आहे.
ढोबळी मिरची
Category:
लेखसंग्रहभारतात आपल्याकडे ढोबळी मिरची फार प्रसिद्ध आहे. आपण त्याला काही लोक सिमला मिरचीसुद्धा म्हणतात. ही मिरची का आली, कशी आली अथवा कुठून आली, हे सांगणे कठीण. काहींच्या मते ही मिरची दक्षिण आशिया खंडातून आली. साधारण १५३० साली ब्रिटनला ही झाडे आली. मात्र अरब लोकांनी ही झाडे लावली व त्याला हिरवे शेत असे म्हणू लागले. काही लोकांच्या मते ही मिरची इराणमधून आली आणि ती भारतात अवतरले.
लाल भोपळा
Category:
लेखसंग्रहजगाच्या पाठीवर लाल भोपळा अनेक ठिकाणी सापडतो. अगदी भारतापासून ते भारताच्या पलीकडे लाल भोपळा मिळतो. मात्र उत्तर अमेरिकेपासून लाल भोपळा त्वरित सापडतो. एवढेच नाही तर लाल भोपळ्याचे अगदी लहान आकारापासून म्हणजे १ किलोग्रॅमपासून ते अगदी ४५० किलोग्रॅमपर्यंतचे भोपळे अमेरिकेत तयार होतात.
हरभरे अथवा चणे
Category:
लेखसंग्रहएक अत्यंत पूरक अन्न. चणे अथवा हरभरे खाल्याने प्रचंड शक्ती वाढते. त्यामुळे माणूस कधीच थकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोड्याला नेहमी चण्याचा अथवा हरभऱ्याचा खुराक देतात. कारण या शक्तीने घोडा कितीही धावू शकतो. हरभऱ्यात काय नाही. अनेक गोष्टी हरभऱ्यातून मिळतात. हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात. अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्यात आपल्याला जे इसेंशियल अमायनो ॲसिड ही सर्व प्रथिनात म्हणजे दहाही अमायनो अॅसिड असतात.
तुळस
Category:
लेखसंग्रहपाच हजार वर्षे उलटून गेली पण अगदी तेव्हापासून तुळस ही अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत वाढते. आयुर्वेदात संस्कृतमध्ये तुळशीला गुलाघ्नी असे म्हणतात. तर इंग्रजीमध्ये याला ‘बासील’ असेही म्हणतात. तुळसही एक धार्मिक उपचार असून ती घरोघरी लावलेले असते. खेडेगावात प्रत्येकजण आपले स्वतःचे घर बांधले तर एक तुळशी वृंदावन बनविण्याची प्रथा असते. तेथेच आपली एक तुळशीचे रोप घेऊन त्याची रोज सकाळी पूजनेनंतर तबकात हळद, कुंकू, फुले घेऊन घरातील महिला तुळशी वृंदावनकडे जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात व सूर्याला अर्ध्य देतात.
नजर डायबेटिसवर
Category:
लेखसंग्रहसामान्य माणसांच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या ग्लुकोजच्या अनियंत्रित पातळीला ‘हायपरग्लायसेमिया’ असे म्हणतात. काही प्रकारच्या रक्तचाचण्यांची पडताळणी करून डायबेटिसची पातळी ठरविली जाते. खूप तहान लागते आणि सतत लघवीला जावेसे वाटणे, ही हायपरग्लायसोमियाची प्रमुख लक्षणे आहेत.