लेखसंग्रह

स्मरणशक्ती

Category:

 

मेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे .

लेखसंग्रह

विरोधी आहार म्हणजे काय?

Category:

 

आयुर्वेदानुसार, विरोधी आहार (कॉन्ट्रास्ट डाएट) म्हणजे अशा अन्नपदार्थांचे मिश्रण, जे एकत्र खाल्ले तर शरीरावर विपरीत परिणाम होतो. असे पदार्थ आपल्या आहारात दीर्घकाळ समाविष्ट केल्याने अंधत्व, वेडेपणा, नशा, अशक्तपणा, त्वचारोग, नपुंसकता आणि वंध्यत्व यांसारखे आजारही होऊ शकतात.

लेखसंग्रह

आंतरराष्ट्रीय योग दिन

Category:

 

आंतरराष्ट्रीय योग दिन पाळण्याच्या प्रस्तावाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी अशोक कुमार मुखर्जी म्हणाले की योग या विषयाला वांशिक-सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाऊन दिलेल्या पाठिंब्याचे हे द्योतक आहे.

लेखसंग्रह

चाळिशीसाठी सज्ज मी

Category:

 

आजच्या धावपळीच्या व दमवणाऱ्या जगण्यात अचानक चाळिशी येते व आपल्याला आपल्यातले हे असे बदल अचंबित करतात. पण लक्षात घ्या की हे सगळे बदल रातोरात होत नाहीत. पळापळीच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असतील तरीही त्यांची दखल घ्यायची जरूरी आपल्याला भासत नाही आणि मग कधीतरी अचानक चालत्या गाडीला ब्रेक बसावा तसे काहीतरी निमित्त होते व जाणवते की खरंच, असं सगळं झालेलं दिसतंय ! पण या सदराद्वारे मी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या चाळिशीसाठी तयार कसे रहायचे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे.

लेखसंग्रह

निर्गुण्डी – एक चित्तवेधक महाऔषधी

Category:

 

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो

लेखसंग्रह

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ४ – पांथस्थांना विसावा देणारा करंज वृक्ष

Category:

 

करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.

लेखसंग्रह

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ३ – सोनसळी पिवळा बहावा वृक्ष

Category:

 

बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू, पिवळ्या-सोनेरी रंगाच्या छटांमुळे ‘गोल्डन शॉवर ट्री’ असंही म्हणलं जातं. अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड.

लेखसंग्रह

कोहळा – एक अमृत फळ

Category:

 

कोहळा किंवा कोहळा भारतात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे. ही मोठी व वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल मूलतः जपान व इंडोनेशियातील व जावा येथून आली असून नंतर तिचा प्रसार आशिया, आफ्रिका व अमेरिका येथे झाला. भारतात बंगाल व पंजाब येथे महाराष्ट्रापेक्षा अधिक लागवड केली जाते.

लेखसंग्रह

बहुपयोगी गुग्गूळ

Category:

 

गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे.