लेखसंग्रह

वेदना

Category:

 

जीवन हा संघर्ष आहे. शारीरिक असो वा मानसिक असो, संघर्षाबरोबर वेदना आल्याच. वेदना नको म्हणून संघर्ष नको असे म्हटले तर जगण्यातले वैविध्य, नाविन्य संपेल. जीवन नीरस, बेचव होईल. वेदनेचा सामना समजून उमजून करण्यातच आपले भले आहे.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १० – पृथ्वीवरील कल्पवृक्ष : नारळ

Category:

 

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ९ – शिवप्रिय वृक्ष : रुद्राक्ष

Category:

 

रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात. इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

Category:

 

बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो.

लेखसंग्रह

शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम

Category:

 

आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते.

लेखसंग्रह

अन्नशुद्धि

Category:

 

आजच्या आधुनिक युगात मनुष्य health concious झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती calaries, calcium, vitamin मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. तो पदार्थ मशीनने बनला असेल तर निश्चिन्त होऊन विकत घेतला जातो. आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून जागृत राहणे आवश्यक आहे.

लेखसंग्रह

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १० – चिकू

Category:

 

चिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z      apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो.

लेखसंग्रह

ब्रह्म मुहूर्त

Category:

 

गेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून जर सफलतेचे शिखर गाठायचे असेल, समाधानी जीवन जगायचे असेल तर ब्रह्म मुहूर्ता मध्ये उठून स्वतःला प्रशिक्षित करावे. मन प्रसन्न व शक्तिशाली झाले तर शारीरिक समस्या ही समाप्त होतील.

लेखसंग्रह

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

Category:

 

फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात