लेखसंग्रह

फायब्रोस्कोप (एंडोस्कोप)

Category:

 

फायब्रोस्कोप म्हणजेच एन्डोस्कोप नावाच्या यंत्राने आपल्याला मानवी अवयवांची अत्यंत अचूक अशी तपासणी करता येते. सर्पिलाकार दिसणाऱ्या या अवयवाने केल्या जाणाऱ्या तपासणीला एन्डोस्कोपी म्हणतात. ही एक प्रकारची दुर्बीण असते व ती मानवी शरीरात घालून कुठे काय झाले आहे हे पाहता येते.

लेखसंग्रह

सोनोग्राफी

Category:

 

मानवी शरीरातील नेहमी तपासता न येणाऱ्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कानांना ऐकू न येणाऱ्या म्हणजे अल्ट्रासाउंड ध्वनी लहरींचा वापर केला जातो. क्ष-किरणांप्रमाणेच या ध्वनिलहरी हव्या त्या भागावर केंद्रित करता येतात.  अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातील ध्वनी लहरींचा उपयोग करून शरीराची तपासणी करण्याच्या तंत्राला सोनोग्राफी असे म्हणतात.

लेखसंग्रह

इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG)

Category:

 

हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते.  यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात.  हे  इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.

लेखसंग्रह

क्ष किरण – एक्स-रे

Category:

 

क्ष किरण म्हणजे एक्स-रे यंत्राच्या शोधाने वैद्यकीय जगतात फार मोठी क्रांती घडून आली यात शंका नाही. जर्मनीचा वैज्ञानिक विल्हेम राँटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला. १८९५ मध्ये त्याला अपघातानेच क्ष-किरणांचा शोध लागला.