लेखसंग्रह

अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

Category:

 

अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.

लेखसंग्रह

ओळख मूल्यांकाची भाग ३ – मूलांक ३

Category:

 

अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो.

लेखसंग्रह

बाळगुटी एक वरदान: भाग १० – बहुउपयोगी सुंठ

Category:

 

मराठीत सुंठीवाचुन खोकला गेला अशी एक म्हण आहे. यातच सुंठीचे व्यवहारातील औषधी महत्व अधोरिखित होते. सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते.

लेखसंग्रह

‘फेब्रुवारी’चे फर्जंद

Category:

 

‘फेब्रुवारी’ मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘सृजनशील, प्रामाणिक, शांत व द्रष्टया’ मानल्या जातात. चालू ‘फेब्रुवारी’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय व मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

लेखसंग्रह

श्रीलंकेला का जावे

Category:

 

भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर, हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात तरंगणारा एक सुंदर बेटराष्ट्र म्हणजे श्रीलंका. प्राचीन काळी याला लंका, सीलोन आणि सिंहलद्वीप अशा नावांनी ओळखले जात असे. आज “मोत्याचे बेट” म्हणूनही हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. श्रीलंका आकाराने लहान असली तरी तिचा इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचे वैभव अपार आहे. रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच भूमीशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी ही केवळ एक परदेशयात्रा नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनुभव आहे.

लेखसंग्रह

विश्वकर्मा शिल्पकार: संकल्पना आणि व्याप्ती

Category:

 

समाज हा एका विशिष्ट वंशाच्या, भाषेच्या किंवा व्यवसायाच्या लोकांचा समूह असतो. समाजाचा जसजसा व्याप वाढत जातो तसतसे त्यातील गुण वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवू लागतात आणि त्या गुण वैशिष्ट्यांना घेऊन आपला वेगळा समूह निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरु होते. यातून मग एक नवा समाज नावारुपास येतो. पुढे हे नावच त्या नवनिर्मित समाजाची मर्यादा आखून देते.

लेखसंग्रह

विश्वकर्मा शिल्पकार: वाकाटक-गुप्त काल ते तेराव्या शतकापर्यंत

Category:

 

गुप्त साम्राज्याचा काळ हा अनेक अर्थाने संपन्नतेचा कालखंड समजल्या जातो. या काळात धार्मिक जीवनात तर मोठाच बदल घडून येऊ लागला होता. धर्माच्या अनेक पंथ-उपपंथाची वाढ होऊ लागली होती. जुन्या वैदिक धमाचे स्वरुप पालटत होते. जुन्या वैदिक देवता व यज्ञ-याग हळुहळु लोप पावू लागल्या होत्या. धार्मिक जीवन अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे वळू लागले होते.

लेखसंग्रह

एक भेट सुरेश भटांची

Category:

 

महाराष्ट्राचे जे चार काल्पनिक भाग मानले जातात, त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा समावेश केला जातो. या चारीही विभागांत अनेक मान्यवर कवी, साहित्यिक, वाङ्मयकार, वक्ते यांची फार मोठी मांदियाळी आहे. आज सुरेश भट या मान्यवर वैदर्भीय कवि-गझलकार यांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडताना त्याच विदर्भातल्या कवी अनिल, (आर. रा. देशपांडे), कुसुमताई देशपांडे, ग. ल्यं. माडखोलकर, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केंचे, पु. भा. भावे अशा किती तरी नामवंत साहित्यिक वाङ्मयकारांची नावं नजरेसमोर येतात. या नावांमध्ये ठसठशीतपणानं दिसणारं एक नाव म्हणजे सुरेश भट.