सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …
Category:
लेखसंग्रहपावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल