लेखसंग्रह

सगुणस्वरूप विघ्नहर्ता – बालदिगंबर गणेश

Category:

 

परंपरेने गणेशाचं हे लोकप्रिय सगुणस्वरूप फार श्रद्धेनं जपलेलं आहे. असं असलं तरी गणपतीपूजनाला खरा राजाश्रय लाभला, तो पेशवे अधिकारपदावर आल्यावर. पेशवे गाणपत्य असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी गावोगाव असलेल्या गणपतीच्या देवळांचं वैभव वृद्धिंगत केलं. अष्टविनायकांच्या स्थानांना प्रतिष्ठा आली. असंच एक पुरातन स्थान आहे कर्जत तालुक्यातल्या ‘कडाव’ला. इथल्या बालदिगंबर गणेशाचे देऊळ फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.

लेखसंग्रह

नवसाला पावणारा .. ‘रेडी’चा व्दिभुजा गणेश

Category:

 

महाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत.

लेखसंग्रह

शिल्पांकित गणराय

Category:

 

हंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत.

साहित्य - ललित

डेंग्यी आणि मलेरीया स्पेशालिस्ट

Category:

 

वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले.

साहित्य - ललित

ज्युडी’ची भन्नाट गोष्ट …..

Category:

 

दुसऱ्या महायुद्धातल्या ‘ ज्युडी’च्या अनेक कामगि-या कल्पनेपलिकडच्या आहेत ….. तिने असंख्य लोकांचे प्राण रक्षण करायला मदत केली. अनेक जहाजांना बुडण्यापासून वाचवले… तिची कामगिरी इतकी मोठी की दुसरया महायुद्धातली एक हिरो ठरली. एच.एम.एस. ग्नट (HMS Gnat) आणि एच.एम.एस. ग्रासहॉपर या दोन जहाजांची ती शुभशकुन करणारी देवताच होती.

साहित्य - ललित

स्वबळावर’….

Category:

 

देशभरातील राजकारणी रोजच्या रोज पुनरोच्चार करत असलेल्या “स्वबळावर” या संज्ञेचा मी किचनमधे वापर करुन स्वबळावर दोघांसाठी उप्पिठ करायचा घाट घातला आणि घात झाला. कीचनमधील कारकीर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात ” जेवणाशिवाय किचनमधे फिरकू नका ” अशी तंबी मिळाली.

लेखसंग्रह

वाहन उद्योगाला मंदी आली ???

Category:

 

ज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत का जेणेकरून असे केल्याने वाहन उद्योगाची मंदी निघून जाईल.

साहित्य - ललित

पोपट पोपटीण आणि जोशीकाका

Category:

 

पुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ढोलीत येणा-या जाणा-यांचा राबता असायचा; जॉइंट फँमिली असावी कदाचित किंवा समाज कल्याणासाठी पोपट दांपत्यानी हिरव्या मिरच्यांचा मोठ्ठा साठा करुन ठेवला असेल येणार्‍या जाणार्‍यांसाठी आणि तेही नसेल तर मात्र पोपटीण दिसायला सुंदर असणार हे नक्की.

उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने
लेखसंग्रह

उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

Category:

 

गणपती जेमतेम ६-७ आठवड्यांवर आलेत; उकडीच्या मोदकाविषयी कोणी काहीच न लिहिण योग्य दिसत नाही. ते खरोखर तोंडात पडण्यापूर्वी निदान थोडी वातावरण निर्माण करण गरजेच वाटतय.

साहित्य - ललित

भक्तीरसाने ओथंबलेली नवी गाणी (विनोदी लेख)

Category:

 

भक्तीरसाने ओथंबलेल्या या गाण्यांच्या भक्तीमय वातावरणात गणोशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती व इतर सणांच्या काळात विविध चित्रपटांची गाणी वाजवली जातात… त्याचा अनेकांना त्रास होतो….! खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो… ही गाणी समजावी व आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न….