लेखसंग्रह

भ्रष्टाचार आणि उपाय !

Category:

 

माणूस जन्माने भ्रष्ट नसतो त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती तसेच इर्ष्या, अतृप्त इच्छा, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते त्यात श्रद्धा-सबुरीचा अभाव आणि अयोग्य मार्गदर्शनाने भ्रष्टाचारापेक्षा भयंकर अश्या विविध अत्याचारासारखी दुष्कृत्ये करण्यास उद्युक्त होतो. दैनंदिन जीवनात माणूस सर्व जगाला फसवू शकतो पण स्वत:च्या मनाला कधीच फसवू शकत नाही ती भिती कुठेतरी असतेच.

लेखसंग्रह

बोलण्याच्या ओघात……..!

Category:

 

आपल्या प्रत्येकाला काहीना काही सवयी व लकबी असतात. बोलण्याच्या ओघात, काहींना आपले मुद्दे मांडतांना व पटवून देताना हातवारे करून सांगण्याची सवय असते तर काहींना दातांने हाताच्या बोटांची नखे कुडतरत बोलण्याची व ऐकण्याची सवय असते. तर काही व्यक्तींना डोळे मिचकावत बोलण्याची सवय असते. असो.

लेखसंग्रह

ट्रेड युनियन्स् आणि संप

Category:

 

जागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्‍याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.

लेखसंग्रह

रेनवॉटर हार्वेस्टींग काळाची गरज

Category:

 

वाढत्या लोकसंख्येच्या रेटयाने माणसांच्या मुलभूत गरजा भागवीताना सुखसोयी व विकासाच्या नावाखाली सुंदर वसुंधरेचे अगणित लचके तोडले जात आहेत याला कुणीही अपवाद नाही. पर्यावरणाचे ऐवढया प्रमाणात प्रदुषण होत आहे की तापमान वृद्धीने नैसर्गिक ऋतू बदलत आहेत. पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त तर कधी अवेळी पडल्याने शेतकर्‍यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाणी टंचाईने शहर व गावातील माणसांना टँकरने किंवा मैलोंनमैल लांब जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

लेखसंग्रह

मुंबईत घर मिळेल का घर?

Category:

 

घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.

लेखसंग्रह

मुंबईचे शांघाय करण्याआधी !

Category:

 

आज सरकार मुंबईचे शांघाय करण्याचा घाट घालीत आहे पण मुंबईत राहणाऱ्या काही नागरिकांच्या व सतत येणाऱ्या लोंढ्यांच्या नसानसात भिनलेला अस्वच्छतेचा निचरा कोण करणार? नागरिकांच्या मानसिकतेवर रत्यांची तसेच सार्वजनीक वाहानांची व ठिकाणांची स्वच्छता अवलंबून असते. स्वतंत्र भारताचे मंत्री, पुढारी व सुजाण नागरिक देशाच्या प्रमुख कार्यक्रमांच्या वेळेस सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या आणि कश्याकश्याच्या शपथा घेतात. समारंभ झाल्याझाल्या मंत्रीच रस्त्याच्या बाजूला पण तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी मारून शपथेला हरताळ फसताना आपण बघतो. निवडणुकींच्या वेळी शपथेवर दिलेली आश्वासने जशी सोईस्कररीत्या विसरली जातात तसेच हे. “गरज सरो आणि वैद्य मरो”.

लेखसंग्रह

कालाय तस्मै नम: !

Category:

 

विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधामुळे सगळ्या गोष्टी सहज व विनाकष्ट उपलब्ध झाल्याने माणूस जसा सुखी झाला तसा तो आळशी व ऐतोबा होऊन सवईचा गुलाम झाला. सवय ही काळ, वेळ व कारणांनी बदलत जाते. आज आपण पहातो सर्वच स्त्री व पुरुषांचे जीवन सवईमुळे बदलल्याने शारीरिक व्याधीत वाढ होताना दिसते. पूर्वी पैसा कमाविण्यासाठी घाम गाळायला लागायचा आता घाम गाळायला पैसा खर्च करावा लागतो यातच सर्वकाही आलं.

लेखसंग्रह

कळत न कळत

Category:

 

आपल्या आजूबाजूला वावरतांना नीट लक्ष देऊन ऐकाल व लक्षात ठेवालं तर कुठल्या ना कुठल्यातरी संधर्भात काही शब्द आपण वारंवार उच्चारताना पाहतो. अर्थात हे शब्द मुद्दामून वापरले जात नाहीत तर सहज ओठावर दररोजच्या चांगल्या का वाईट सवयींमुळे का शिष्ठाचाराने येतात हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे एवढे खरे. पण काही शब्द काळ, वेळ, कारण व प्रसंगाचे भान न ठेवता वापरल्यास अर्थाचा अनर्थ होऊन आपण एका चांगल्या मित्राची/मैत्रिणीची एवढ्या वर्षाची मैत्री गमाविण्याची पाळी येऊ शकते.

लेखसंग्रह

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने….

Category:

 

पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती