क्रांतिवीरांची अमृतगाथा भाग १४-क्रांतीसिंह नाना पाटील
ID: 26714
महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’ हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार' ही संकल्पना अस्तित्वात आली. [...]
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi