कापा-बरका







अ आ आई पारीवरी लिही

साइगतात अम्हा शाळेतल्या बाई

ग ग गणेश, म म मका

कोकणातून आला गणेश काका

फणस आणले कापा बरंका

आधी कापा कापा, मग कापा बरंका

चव न्यारी न्यारी ओळखलस का लेका?

— सौ. सुधा नांदेडकर

Author