आपलं नातं आता कॉफीपुरतं राहिलं आहे,
दोन घोटांमध्ये संपणारं, इतकंच उरलं आहे.
पूर्वी शब्दांना रात्र कमी पडायची,
आता "कशी आहेस?" इतकीच चौकशी उरली आहे.
त्या कपातून अजूनही वाफ उठते,
पण आपल्या नात्याची ऊब मात्र हरवली आहे.
साखर तशीच, चव तशीच,
फक्त सोबतची गोडी कुठेतरी विरघळली आहे.
भेटतो आपण अजूनही कधीतरी,
पण नजरेतला तो थांबलेला क्षण हरवला आहे.
आपलं नातं आता कॉफीपुरतं राहिलं आहे,
कप रिकामा झाला आणि संवादही संपला आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
आपलं नातं आता कॉफीपुरतं राहिलं आहे,
दोन घोटांमध्ये संपणारं, इतकंच उरलं आहे.
पूर्वी शब्दांना रात्र कमी पडायची,
आता “कशी आहेस?” इतकीच चौकशी उरली आहे.
त्या कपातून अजूनही वाफ उठते,
पण आपल्या नात्याची ऊब मात्र हरवली आहे.
साखर तशीच, चव तशीच,
फक्त सोबतची गोडी कुठेतरी विरघळली आहे.
भेटतो आपण अजूनही कधीतरी,
पण नजरेतला तो थांबलेला क्षण हरवला आहे.
आपलं नातं आता कॉफीपुरतं राहिलं आहे,
कप रिकामा झाला आणि संवादही संपला आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 2