कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक . हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य – रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत – मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून याविषयी मात्र पूर्णपणे मतैक्य . आणि फक्त मतैक्यच . मुक्ता बरवे आणि अजय पूरकर या दोघांच्याही नाट्य- क्षेत्रातील कारकीर्दीला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवणारी अशी या दोघांची या नाटकातली कामगिरी आहे . या नाटकातील इतर कलाकारांचीही , अगदी चाळीसच्या चाळीस NCC cadet सह , ( आमच्या डोम्बिवलिचे आहेतते ) सगळ्यांचीच कामगिरी इतकी उत्तम आहे की त्याशिवाय हे नाटक इतके उठावदार , इतके परिणामकारक होणारच नाही .
आपण सगळेच इतके आपल्या स्वतःच्या सवयीन्चे गुलाम असतो की एखादी सवय एकदा लागली की लागली . लोक त्याबाबत आपल्याला कितीही बोलली ( चांगलेही आणि वाईटही ) तरी आपण तसेच वागत राहातो . अगदीआपल्या स्वतःच्याही नकळत .
आता हेच पाहा ना ! अलिकडच्या काळात मला एक सवय लागली आहे . . ती म्हणजे कोणतेही नाटक , कोणताही सिनेमा पाहाताना , माझ्याही नकळत माझे मन त्या कथा – वस्तूची , त्यातल्या संवादाची सांगड गुंतवणूकक्षेत्राशी घालू लागते . इतकेच नाही तर ते मी असे फ़ेसबुक वर लिहीत जातो . त्याचीही आता सवयच लागली आहे . सवय कसली , अगदी व्यसनच म्हणा ना ! ! ! ” सवयीतूराणा न भयं न लज्जा ” अशातली गत . . . . मीअसे लिहिलेले वाचण्याची सवय तुम्हांलाही लागली असेल आणि तो ” जुलमाचा राम – राम ” नसेल अशी आशा आहे .
हे आता इथे आठवायच कारण म्हणजे या नाटकाच्या प्रौढ नायकाला आपली कमांड सर्वोच्च पातळीवर असण्याची इतकी सवय झालेली असते की ते स्थान टिकवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो . अगदी त्याच्यावरिष्ठनी तसे करण्यास औपचारिक , आणि अनौपचारिक रित्याही , मनाई केलेली असूनसुद्धा . या स्थितीचे वर्णन या नाटकाच्या जाहिरातीत फार छान , समर्पक शब्दांत येते . . . . ” कर्तव्य आणि कर्त्यव्याचा अतिरेक यांतलीसीमारेषा पातळ . . . ”
दोन – तीन वेळा हे नाटक पाहूनही ही ओळ काही माझा पिच्छा सोडता सोडत नाहीये . माझाही याबाबतीत अतिरेक होत आहे की काय अशी माझी मलाच शंका यावी इतका पिच्छा .
पण दरवेळी मला असे वाटते की आपणां सगळ्यांचे स्वतःच्या गुंतवणुकीबाबत असे झाले पाहिजे . अगदी पूर्णपणे नाही तरी फार मोठ्या प्रमाणात तरी .
पण ते नाही होत ना तसे ! ! ! झाले तरी ते फारच थोड्या जणांचे होते आणि झाले तरी फार थोड्या प्रमाणात होते . हीच तर खरी शोकांतिका आहे . अशावेळी ” कोडमंत्र ” हे नाटक ज्या मूळ पुस्तकावर आधारीत आहे , त्यापुस्तकाचे नाव ” A Few Good Men ” असॆ आहे याचे नवल वाटेनासे होते . काही ( काहीच हो ) माणसे गुंतवणूक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असतात आणि ती ” चांगलीही ” असतात बरं का ! ! अगदी ” पैशांच्या मागेलागला ” अशी हेटाळणी जरी त्यांच्यामागे केली गेली तरी .
जणू काही इथेही ते काम फक्त ” A Few Good Men ” यांचेच .आपण सगळे गुंतवणुकीच्या बाबतीत अनिच्छ आणि अनिच्चेचा अतिरेक , अद्न्यान आणि अद्द्न्याचा अतिरेक , आळस आणि आळसाचा अतिरेक , अभाव आणिअभावाचा अतिरेक यांच्या सीमारेषा पातळ करण्याच्या फिकिरीत असतो . खरं म्हणजे , याच नाटकातील वाक्य वापरत सांगायचे तर याबाबतीत आपली मनोभूमिका ” १ टक्का जरी चान्स असला तरी त्यासाठी आपण टक्के प्रयत्नकरायला हवे . ” अशी आणि अशीच असायला हवी . फक्त त्यासाठी गुंतवणूक करत राहण्याची सवय अंगी बाणवून घेतलिच पाहिजे . आणि तीही भक्तिने ; सक्तीने नव्हे . पुन्हा याच नाटकातील वाक्य आधाराला घेत सांगायचेझाले तर ” मंत्र श्रद्धेने म्हणायचे असतात ; सक्तीने नव्हे . ” मंत्र म्हणण्यासाठी आधी त्याची माहीती , मग त्यांचा अभ्यास आणि मग त्यांचा सराव असावा लागतो . तेंव्हाच ते मंत्र पावतात . गुंतवणूकीचेही अगदी तसेच असते. अगदी अविचल श्रद्धेची दोन्ही क्षेत्रे आहेत ही . . . . . .
हे असे जमवण सुरवातीला कदाचित कठीण वाटेलही . पण ते जमवण असलेच तर कठीण आहे ; अशक्य नाही . वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे . नियमितपणे गुंतवणूक करत राहणे हीआपली स्वतची गरज आहे हे आपण मनमोकळं होत मान्य करावे लागते . एकदा ते मान्य केले की या नाटकात सांगितले आहे तसे ” जरूरत की चीज़ें ढूँढ़ने मे वक्त नही लगता ” याचा ( प्रसन्न ) अनुभव येऊ लागतो . हे असॆवागणे हळूहळू अंगवळण पडले की तो आचारधर्म ही बनू शकतो . बनतोही काळाच्या ओघात . आणि असे होत असतानाच परत एकदा ” कोडमंत्र ” नाटकातले वाक्य आधाराला घेत बोलायचं असेल तर ” गरज ही धर्मापेक्षा मोठीअसते ” हे मनोमन उमजू लागते . ( हे नाटक पहिल्यांदा पाहात असताना हे वाक्य जेंव्हा मी ऐकले तेंव्हा निष्कारणच मला दूरचित्रवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या एका चहाच्या ब्रॅंड ची जाहिरात आठवली होती . असो . )
नियमितपणे गुंतवणूक करत राहण्याची सवय स्वतःला लावून घेत असताना एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर – बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टींवर नाहीयाची माहिती करून घेत राहण्याची ही सवय करून घेत राहावी लागते . कारण बळीचे बकरे शोधण्यात हे क्षेत्र एकदम तरबेज असते . ” जाळे कुठे टाकायचे हे कोळ्याला नेमके माहीत असते ” हे या नाटकातील वाक्य त्यापरिस्थितिचे एकदम चपखल वर्णन आहे .
हे महत्वाचे अनेक कारणांनी आहे . असते . पहिले म्हणजे हा पैशांचा मामला आहे . त्याबाबत आपली सहनशक्ती सर्वार्थाने मर्यादीत असते .
दूसरे म्हणजे चांगल्या सवयी लागायला नेहमीच जास्त वेळ लागतो . वाईट सवयी मात्र लगेचच लागतात . निदान लागू शकतात .कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देण्याची शेअर – बाजाराला उपजतसवय असते . ती तेवढी आपण विनासायास अन्गिकारतो . मग त्यातूनच ” सफरचंद कापायला सूरी ऐवजी कुर्हाड ” वापरली जाऊ शकते .
तिसरे म्हणजे गुंतवणूक क्षेत्रातील संधी या नेहमीच माहितीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात . अशी माहीती विश्वासार्ह्य असणे अत्यावश्यक असते . या बाजारातच असॆ नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी चूक आणि बरोबर ,सत्य आणि असत्य अशा सगळ्याच बातम्या फिरत असतात . त्यातही खरी बातमी पसरायला जास्त वेळ लागतो . खोटी बातमी मात्र वाऱ्यांच्या वेगाने फिरते . या नाटकात याबाबत छान वर्णन आहे . त्यानुसार ” सत्य पायातचप्पल घालून घराबाहेर पडे पर्यंत असत्य अनवाणी अख्ख गाव फिरून आलेले असते . ” त्यामुळे त्याची शहानिशा करावी लागते .
याबाबत अजूनही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे या नाटकात जरी ” पुरावे नसतात ही सत्याची लाचारी असते ” असॆ जरी म्हणले असले तरी गुंतवणूक क्षेत्रात मात्र सत्याला पुरावे असतात . खरं म्हणजे , फक्तसत्यालाच पुरावे असतात . ते सहजासहजी उपलब्ध असतीलच , असतातच असॆ नाही . पण ते असतात . प्रसार – माध्यमे आणि जग – दुनिया यांनी उठवलेल्या उलट – सुलट चर्चेच्या गदारोळत ते नीट दिसत नाहीत , ऐकूयेत नाहीत काहीवेळा ! ! ! पण ते असतात . ते पाहाणयाची सवय मात्र लावून घ्यावी लागते . ते फारसे सोपे नसते . आपल्या मनाच्या ठाम समजूती , आपले भाबडे विश्वास , आपणच आपलीच घातलेली , करून घेतलेलीसमजूत अशा अनेक गोष्टी त्याच्या आड येत असतात . सत्य आणि भाव – बंध , सत्य आणि नातेबन्ध याची बहुपदरी वीण ओलांडून पुढे जाणे का सोपे असणार आहे ? पण तसे जाणयाला काही पर्याय नाही . ( ” आयुर्विम्यालापर्याय नाही ” हे वाक्य निश्कारनच मनात डोकावून गेले ना ! ) पण गुंतवणूक क्षेत्रातली ” शर्यत जिंकणे आणि हरणे ” त्यावर अवलंबून असते . त्यासाठी नियमित गुंतवणूक हे आपल्या सगळ्यांचे नित्य – कर्तव्य बनलेच पाहिजे. ” कोड – मंत्र ” नाटकातील संवाद घेत सांगायचे झाले तर गुंतवणूक नियमितपणे करत राहण्याच्या ” कर्तव्यात सबब दिली नाही आणि स्वीकारलीही नाही ” असं झाले पाहिजे . यातूनच सत्य स्वीकारण्यास लागणारी ” ताकद ,हिम्मत आणि किंमत ” मिळते . आणि ती मिळाली की ” सत्याला धरून चालन्याची ताकद असणारा आत्महत्या करत नाही ” म्हणजे काय ते प्रत्यक्षात अंमलात आणता येते .
त्यासाठी आपल्या स्वभावानुसार , ऐपतीप्रमाणे आपलीच आपणच एक आचार – विचार संहीता बनवायची गरज , आवश्यकता असते . कारण ती व्यक्तिसापेक्श असते . एखादे औषध खोकल्यावर चालते हे जरी बरोबर असलेतरी त्या औषधांची त्या संबंधित माणसाला अलेर्जी तर नाही ना याचा विचार ते औषध त्या माणसाला देण्या – घेण्याआधी करावाच लागतो . तसेच ते औषध , त्या माणसाला , त्यावेळी देता येणार असले तरी ते किती प्रमाणातद्यायचे हे परिस्थितींनुसार बदलू शकते . औषधांच्या प्रमाणाबाबत जरी काही ठोकताळे असले तरी ते काही प्रमाणात सापेक्ष असतात . त्याबाबत आपण ठरवलेली संहीता म्हणजे कोडमंत्र . ती काही कोणत्या पुस्तकात लिखितस्वरूपात दिलेली नसते . ती अनुभवातून सिद्ध होत राहते . ” Internally official Disciplinary Measure ” म्हणजे कोडमंत्र असंच तर या नाटकात सांगितले आहे . यंत्र ( हत्यार ) , तंत्र ( जबाबदारी ) आणि मंत्र (चुकिला क्षमा नाही ) यातूनच हा आणि असा ” कोडमंत्र ” घडत जातो . घडत राहतो . त्याचा अतिरेक झाला तर ” कोर्टमार्शल ” होते असॆ नाटक आहे .
कोणत्याही ” कोडमंत्र ” च्या अभावातून आपले आर्थिक आयुष्य प्राणांस मुकते .
कोडमंत्र हे मराठी नाटक मूळ गुजराथी नाटकावरून बेतले आहे हे अशावेळी फार सांकेतिक वाटू लागते .
तसेच हे नाटक आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना अगदी पहिला विचार जो माझ्या मनात आला ( इथे मात्र तो मी या लेखाच्या शेवटी मांडत आहे . ) तो मात्र अगदी बालिश होता . या नाटकात ४० NCC cadetsआणि दहा कलाकार मिळून एकूण ५० कलाकार आहेत . आपल्या NIFTY या निर्देशान्कातही ५० कंपन्यांच्य शेअर्सच्या बाजार – भावांचा समावेश असतो ; तर या चाळीस आणि दहा यांच्या वजाबाकी इतके म्हणजे ३० कंपन्यांच्याशेअर्सचा आपल्याच Sensex मधे समावेश असतो . हा गन्मतीचा भाग सोडून देत आपली गुंतवणूक कोडमंत्र या नाटकांसारखीच प्रचंड यशस्वी होवो हीच सदिच्छा . शुभेच्छा .
असा साक्षेपी , सापेक्ष कोडमंत्र उघड्या डोळ्यांनी , सदसदविवेकबुद्धी जाग्रुत ठेवत नियमितपणे गुंतवणूक करण्यातून आपल्याच आयुष्याची कामगिरीही वेगळ्याच पातळीवर जाईल . . . . या नाटकातल्या कलाकारांच्याअभिनयासारखी . याविषयी अगदी मतैक्य . आणि मतैक्यच .
कोडमंत्र . कोडमंत्र गुंतवणूकीचा .
चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१
मोबाईल – ९८२०२९२३७६ .
E-Mail – tilakc@nsdl.co.in
९ डिसेंबर २०१६