सेमी ईंग्लिश मिडियम च्या आईने आपल्या मुलाला शिकविलेलि कविता...!
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
ढगांशी wind झुंजला रे..
काळा काळा cotton पिंजला रे..
आता your पाळी, तुला give टाळी..y
फुलव पिसाराss Dance..
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance..
झरझर edge झरली रे..
झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये न्हाउ, Something गाऊ
करुन पुकारा Dance,
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
थेंब थेंब तळ्यात dancing रे
टप टप पानांत sounding रे..
Rainच्या रेघांत, Play खेळु दोघांत Blue सवंगड्या Dance,
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
Rainची रिमझिम stopली रे
तुझी माझी pair जमलीरे
Skyमध्ये छान छान Seven रंगी कमान
कमानीखाली त्या Dance,
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance
?☺???
February 22, 2017
उलट पालट सारे घडे,
दिसानंतर रात्र चढे,
खेळ सारखे निसर्गाचे,
त्याचेच ना कोडे पडे,--!!!
कधी उष्णतेची रांस,
कधी शीतल चंद्रप्रकाश,
कधी मुसळधार पाऊस,
केव्हा शांत निरभ्र आकाश,--!!
कधी पृथा हिरवी हिरवी,
कधी सचैल पहा भिजलेली,
कशी रुक्ष कोरडी-कोरडी,
कधी थंडीने समेटलेली,--!!!!
धरेवर असंख्य झाडे,
वृक्ष,लता आणखी वेली,
बहरलेली फुले पाने,
विविधतेने का नटलेली,-?!!
एक नसे दुसऱ्यासारखे,
रंग त्यांचे निरनिराळे,
चवी,आकार नक्षी,
सगळेच दिसे वेगवेगळे,--!!!
धरेवरील मानव,प्राणी,
ठेवण त्यांची आगळी-वेगळी,
आकार, उंची, वजने, यष्टी,
का असे विविधता इतुकी,--!!!
रंग वेगळे,वेगळे त्यांचे,
स्वभावातील अनेक कंगोरे,
आवाजाचे पोत निराळे,
डोळ्यांचेही रंग निराळे,--!!!
पाण्याचे प्रकार निराळे,
कधी नदी दिसे वाहती,
आगळीच त्यांची स्थाने,
कधी सागरास येई भरती,--!!
हिमगौरी कर्वे.©
March 22, 2019
( जुन्या काळीं, अर्जन्सी दर्शविण्यासाठी असें लिहीत –
‘जेवत असलात तर हात धुवायला इकडेच या’.
त्या आधारानें, हें काव्य, जरासें खट्याळ ).
तुम्ही
तातडीनें इकडे या,
अर्जंट या.
जेवत असलात तर
हात धुवायच्या आधी
इकडे या.
अन् मत द्या.
पाणी पीत असलात तर
फुलपात्रं खाली ठेवण्यांआधी
इकडे या.
अन् मत द्या.
आंघोळ करत असलात तर
कपडे बदलण्यांपूर्वी,
ओल्या कपड्यांनीच
इकडे या.
अन् मत द्या.
पण दुसरा ‘अर्जंट कॉल’
आला असला,
आणि तुम्ही
टॉयलेटमध्ये असलात तर,
तर घाई करूं नका,
तुमचा वेळ घ्या,
तिकडेच हात धुवा,
नंतर या.
मात्र, या.
अन् मत द्या.
(आणि तेंही आम्हालाच). १
कारण,
तुमच्या भेटी घेऊन,
अन् तुम्हाला ‘भेटी’ देऊन
आम्ही इनव्हेस्ट केलेलं आहे,
त्याचं ‘रिटर्न’
नको कां आम्हाला मिळायला ? २
आमचा कँडिडेट
निवडणुकीतून ‘रिटर्न’ होऊन
घरीं बसायला नको ;
तर, तो
MLA म्हणून
विधानसभेत
‘रिटर्न’ व्हायला हवा. ३
म्हणून,
जेवत असलात तर
हात धुवायच्या आधी
इकडे या.
अन्, टॉयलेटमध्ये असलात तर
दमानं या,
हात धुवून या.
पण या जरूर. ४
हात धुवा किंवा धुवूं नका,
पण धुतल्या तांदळासारखं वर्तन ठेवा,
या, आम्हांलाच मत द्या,
आणि आम्हांलाच जिंकवा. ५
- - सुभाष स. नाईक
July 31, 2018
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 18, 2020
नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे ।
येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।।
निराशूनी जावू नकोस रागें रागें ।
हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।।
विणाविस यशाची शाल धागे धागे ।
सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।।
सतत रहावे जीवनी जागे जागे ।
तेव्हाच यश येत असते भागे भागे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 20, 2017
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 1, 2017
स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन
घामेजले शरीर, भडका दिशांत झाला
दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला
तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला
निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला
स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले
आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले
ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी
स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी
सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते
पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध झाले
ही स्वैरता अघोरी, कैसा विकास झाला
स्वातंत्र्य भोगताना, हा सर्व घात झाला
संस्कारहीनतेसी, येथे मिळे प्रतिष्ठा
ढोंगीच तज्ञ बनती, तज्ञां मिळे उपेक्षा
सेंद्रिय नासवोनी, करतात रोज हत्या
ही लादली गुलामी,कैसी स्वतंत्र जनता
ही आजची अवस्था नाही उगाच झाली
सात्विक वारशाची आम्हीच हानी केली
स्वातंत्र्य गर्जताना, स्वार्थां जतन केले
आम्हीच मातृभूला, ऐसे उजाड केले
स्वैराचारी जमते जनता
एकच त्यांचा असतो गलका
मोफत सारे द्या द्या म्हणती
धोंडे मारत दंगे करती
कर्जे घेऊनी फेड न करती
स्वैराचारे व्यसने करती
राष्ट्रहिताचा विचार सोडूनी
संविधान हे सहजी मोडिती
जनसेवेची करूनी चेष्टा
उपभोगिती जे सदैव सत्ता
निवृत्तीचे वेतन घेती
पुन्हा पुन्हा जरी निवडून येती
या स्वैरतेस आज देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
तोंडात एक भाषा, पोटात देशद्रोह
राष्ट्रास तोडणारे , ऐसे अभद्र भाव
निसर्ग आणि भूमी,केली उजाड ऐशा
ढोंगीजनांस आता, देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
रचनाकार : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने.
मोबाईल : ९८८१३७३५८५
August 22, 2023
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने ।
तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।।
कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी ।
प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।।
शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी ।
आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।।
खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो ।
सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 6, 2019
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 9, 2017
खंत वाटली मनास
कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला
नाही जाणला संसार ।।१।।
पुढेच गेले सगे सोयरे
आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले
श्रीमंत झाली सगळी ।।२।।
वेड्यापरी बसून कोपरी
रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला
कां फुका हा वेळ दवडीता ।।३।।
सग्यांच्या उंच महाली
बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी
कौतुके झाली कवितांची ।। ४।।
व्यवहारी निर्धन जरी तो
विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे
गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti