बागेतील तारका-
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे
टकमक पाहात होत्या, हांसत चोहीकडे
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती
हातवारे करुन त्या, माना डोलावती
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी
अज्ञानी गरीब बिचार्या, जेंव्हा संकल्प करती
कळसुत्री बाहूल्या त्या, दोर इतरां हातीं
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail - bknagapurkar@gmail.com
December 3, 2012
एक ती झोप स्वप्न बघत राही
शिणवून शरीर ताप जीवास सुख देई
स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा
एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां
स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती
डॉ. भगवान नागापूरकर
२४- १११२८३
September 28, 2014
माझे म्हणूनी जे मी धरले,
दूर होई ते मजपासूनी,
दूर ही जावूनी खंत न वाटे,
घडत असते कसे मनी ।।१।।
बहुत वेळ तो घालविला,
फुल बाग ती करण्यामध्ये,
विविध फुलांची रोपे लावूनी,
मनास रमविले आनंदे ।।२।।
कौतुकाने बांधी घरकूल,
तेच समजूनी ध्येय सारे,
कष्ट करूनी मिळवी धन,
खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।
संसार करूनी वंश वाढवी,
संगोपन ते करूनी त्यांचे,
थकूनी जाई देह आता तो,
चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।
ओढ आतां उरली न काही,
ज्याच्यासाठी तगमगलो,
निवृत्तीची वृत्ती मिळूनी,
समाधानी तो होऊ शकलो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 11, 2017
राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती
म्हणून दिसे आम्हां विध्वंसक प्रवृती
नाश करण्यासाठीं शक्तिच हवी येथे
हेच रुप शिवाचे समजण्या अवघड जाते
जागा करु देई नविन घटनाना
चक्र कसे चालेल न मिटवता त्यांना
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 2, 2019
प्रवास लोकलचा...
खिडकी जवळचे सीट
दोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागा
फॅन खालचे सीट
दरवाज्यात उभे राहून हवा खाणे
सामान वर ठेवणारा स्वयंसेवक
गरजूना जागा देणारे दयाळू
कुठे उतरायचे ते सांगणारे गाईड
स्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे
चौथे सीट
मसाज घेत उभे राहण्याची धडपड
हाडे मोडतील ही भीती
मोबाईल, पाकीट मारले जाईल ही भीती
फाटलेले पत्रे आणि बॉम्बची भीती
धक्का-बुक्की, घाम, वास
दारूचा वास आणि धुंदी
गाडीतून पडून मरण्याची भीती
लाटेसारखा येणारा आणि जाणारा गर्दीचा दबाव
दुसऱ्याच्या पायात घातलेला पाय, घवले वळणे
खेटणे, दाबणे, बलात्कार, लाल-पांंढरी थुंकी, रक्त, शु, शी आणि उलटी
ढोलकी, टाळ आणि पत्ते
कोपरापासून तुटलेला की कापलेला हात
गुडघ्यापासून तुटलेला की कापलेला पाय
घुंगरू, डफ आणि नाच
शेम्बडी गोड बाळे आणि त्यांच्या अस्थीपंजर आया
मोबाइल गेम्स, डाउनलोड केलेल्या फिल्म्स, सिरिअल्स
भिकारी, व्यापारी, मवाली, गर्दुल्ले
बहुभाषिक शिव्या आणि भांडणे
चणे, शेंगा, आलेपाक, गोळ्या
चित्रांची पुस्तके, टाचण्या, पिना आणि रबर
खास कंपनीने स्वस्तात दिलेले
तीन सीटांवर निश्चिंत झोपलेली माणसे
दरवाजात मांडी ठोकून बसणारी माणसे
स्थितप्रज्ञ गार्ड आणि ड्रायव्हर
टपावरची माणसे
आणि चाकाखालचीही माणसे
प्रेत आणि नवजात
सुख आणि दुःख
माझे आणि तुझे
मान आणि अपमान
अभिमान आणि दुराभिमान
चांगले आणि वाईट
स्वच्छ आणि घाण
आणि आपले स्टेशन आले की...
एका क्षणात
सगळा खेळ खल्लास...
अगदी थेट आयुष्यासारखा
-- शुभराज बुवा
December 25, 2018
January 18, 2014
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 24, 2016
हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 30, 2017
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 23, 2020
वाहत असते जीवन सारे, वाहने जीवनाचा गुणधर्म
स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म
वाहात होते, वाहात आहे, भविष्याते वहात जाईल
सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल
आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जिव वस्तूसुद्धा प्रवाही
अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई
अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने फिरती
केवळ त्यातील वेगामुळे, स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti