(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कृपा दयाघनाची

    हॄदयस्थ ब्रह्म.!
    नित्य नांदते आहे!

    अंतरीचे भावशब्द
    स्वरी गुंफले आहे!

    स्वरात मी दंगलो
    भान हरपलो आहे!

    आलाप गंधर्वांचा
    षड्जाचाच आहे!

    अव्यक्त प्रीतीभाव
    शब्दी सांडले आहे!

    तृप्त मी, तृप्त मी
    जीवन सुखद आहे!

    लाभले सारेच
    संचिती दान आहे!

    कृपा दयाघनाची
    मीही कृतार्थ आहे!

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १६३.

    २७ - १२ - २०२१.

      January 16, 2022


  • त्या झऱ्यापाशी

    त्या झऱ्यापाशी,
    एकच झाड उभे होते,
    निश्चल, निर्धास्त, अढळ,
    वाऱ्यावर झुलत होते ,
    वर्षे गेली दिन गेले,
    रात्री आणि दिवस सरले,
    अनेक बाके प्रसंग आले,
    आले गेले नि परतले,
    झाड मात्र तसेच राहिले,
    झऱ्याकाठी लोक येती,
    पाण्याने ताजेतवाने होती,
    अनेक म्हातारे कोतारे ,
    डोळ्यातून पाणी काढती,
    त्यांच्या असती किती,
    तारुण्यातील गोड स्मृती,
    तिथेच येती तरुण-तरुणी,
    हातात हात आपुले गुंफुनी,
    विफल प्रेमाचे बसता चटके,
    इथेच येऊन अश्रू ढाळती,
    झाडाखाली तरुण जोडपी,
    संसारातील गोष्टी करती,
    वाद भांडणे प्रेम सारे,
    झाडाला पहायला मिळती,
    कुणी एकाकी जीव भटकती,
    आपले दुःख प्रकट करती,
    लहान मुलांगत सारखे रडती,
    दु:ख वाटून झाड संन्यासी,
    कुणी येई त्या डोंगरमाथी,
    वैतागून जीवही देई ,
    निष्काम ते कर्मयोगी,
    झाड निमूट बघत राही,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 18, 2019


  • कसे जगावे

    आता न कुणीच उरले असे जीवाचे
    ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे

    गाभाऱ्यातील प्रकाशज्योत निमाली
    अंधारल्या, आठवातुनी कसे जगावे

    एकांती छळतो भावप्रीतीचा गारवा
    गोठविणाऱ्या वेदनेतुनी कसे जगावे

    दाटला सभोवार निर्विकार काळोख
    आता उगा, कुणाला शोधित जगावे

    आता न कुणीच उरले असे जीवाचे
    ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२९१

    ८/११/२०२२

      November 19, 2022


  • तू किती पारदर्शी

    तू किती पारदर्शी,
    दाखवशी आरपार,
    तुझ्यापासून कोण लपवी,
    आपुले रे निखळ अंतर, --!!!

    माणसा, तू कसा असशी
    बघ एकदा निरखून,
    काय चालले तुझ्या चित्ती,
    भावनांचेच चढ-उतार, --!!!

    वरून पाहता प्रतिमा देखणी, लक्षपूर्वक पहा वरील रूप,
    आत खळाळत्या खोल समुद्री, मनाची डचमळे कशी लाव,

    रूप, रंग, गंध ,स्पर्शी,
    कुठलेही नसे संवेदन,
    संवाद साधावा आरशाशी,
    राहून स्थिर अगदी निश्चल,--!!!

    स्वतःकडे पहा माणूस म्हणुनी स्थान आपुले आहे काय,
    मग ठरवावे विचारांती,
    महत्त्व तेही, नक्की काय--!!!

    तू खरे चित्र दाखवी,
    मनुजा करीत आवाहन,
    रूप त्याचे फक्त वरपांगी,
    रंग खरे आत विलक्षण,

    जीव अस्वस्थ तुझ्या भेटी,
    आत कुठे चाले खळबळ,
    काय लपवले मी हृदयी,
    विचार करतो असा निव्वळ,--!!!

    आरशां, तू खरा मुनी,
    शांत स्थिर स्थितप्रज्ञ,
    माणूस असता विमोचनी,
    तारक नसतो कुणी अन्य,--!!!

    हिमगौरी कर्वे©

      August 18, 2019


  • मीरेची तल्लीनता

    नाच नाचती तालावरती

    मीरेची पाऊले

    चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ

    लागला प्रभुचा ध्यास

    हरि दिसे नयनास

    चलबिचल नजर होऊन

    अंग सारे मोहरले - - -१

    चित्त ते हरीमय जाहाले

    न राही आपले भान

    झाली भजनी तल्लीन

    तनमन प्रभुचे ठायी जाता

    संसार ते विसरले. - - - २

    चित्त ते हरीमय जाहाले

    विषाचा घेता प्याला

    हरि तो त्यातची दिसला

    झेपावूनी गेली त्याच क्षणी

    घट घटा प्राशन केले. - - - ३

    चित्त ते हरीमय जाहाले

    जहाल होते विष

    मृत्युचा तो पाश

    प्रभूभक्तीच्या शक्तीने परि

    अमृत ते बनले - - - ४

    चित्त ते हरीमय जाहाले

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 19, 2016


  • फुलपाखरे

    धरू नका ही बरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे । धृ. ।।

    काल पाकळ्या रात्री निजल्या
    सकाळ होता सगळ्या उठल्या
    आणि त्याच का उडू लागल्या
    पंख फुटुन गोजिरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।१॥।

    मजेमजेचे रंग तयांचे
    संध्याकाळी जसे ढगांचे
    ऊन कोवळे त्यावर नाचे
    सकाळचे हासरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।२।।

    फुलाफुलाशी हासत खेळत
    फिरती भवती पिंगा घालित
    बघा दुरूनच त्यांची गंमत
    दृश्य मनोहर खरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।1३॥।

    हात लावता पंख फाटतिल
    दोरा बांधुन पायहि तुटतिल
    घरी कशी मग सांगा जातिल ?
    दूर तयांची घरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।४।।
    उगाच धरिता त्यास कशाला ?
    अपाय करिता मुक्या जिवाला ?
    आवडेल का हे देवाला?
    ही देवाची मुले,
    फुलांवर उडती फुलपाखरे ! ।५॥।

      July 2, 2026


  • जनसेवा

    आता दुनियेत| होती खूप हाल|
    सुकलेत गाल| शोषितांचे||१||

    पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
    चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||

    करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
    नाही मला भान|देवा आता||३||

    थोडी जनसेवा| हातून घडावी|
    साथ रे मिळावी| देवराया||४||

    भाव पामराचा| समजून घ्यावा|
    आशिष असावा| देवा तुझा||५||

    पुसू देत डोळे| भरवू दे घास|
    जगण्याची आस| वाढो त्यांची||६||

    अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
    बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||

    -- महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले(ऋतुराज)
    दि. २२/०९/२०१९

      September 25, 2019


  • होते पहाट आल्हाद गारवा

    होते पहाट आल्हाद गारवा
    झेडीतो हलकेच शिरशिरी मारवा,
    प्राजक्त उमलतो हलकेच असा
    अंगणी बहरुन गंधित सडा..
    उगवतो रवी केशरी प्रभा
    रंग बावरे किरमिजी आभा,
    उगवत्या रवीस उषेची साथ जरा
    दवबिंदूची दाटी पानोपानी थेंब सजता..
    किलबिल पक्षी थवा आकाशी जसा
    माळ एका लयीत फिरफिरती पाखरे पुन्हा,
    सजले आकाश सजली नटून धरा
    थबकले मन परतुनी वळणावर पुन्हा या..

    -- स्वाती ठोंबरे.

      December 2, 2021


  • स्मृति

    जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं
    विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।

    बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना
    देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।

    काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती
    परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।

    प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी
    पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 2, 2017


  • रवि – उदयाचे स्वागत

    उठा उठा हो सकळजन

    स्वागत करु या रविउदयाचे

    फूलून जाते जीवन ज्याने

    त्या सूर्य आगमनाचे //धृ//

    उषाराणीची चाहूल येता

    चंद्रतारका ढळल्या आतां

    चराचराना जागे करण्या

    चाळवी निद्रा हलके हाता

    वंदन करु या लिन होऊनी

    चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१//

    स्वागत करुया रविउदयाचे

    रंगबेरंगी सुमने फुलली

    वाऱ्यासंगे डोलू लागली

    दरवळूनी तो सुगंध सारा

    वातावरणी धुंदी आणली

    मकरंदापरि चंचल होऊनी

    स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२//

    स्वागत करुया रविउदयाचे

    पक्षी येती किलबील करिती

    उठा उठा ते सांगुन जाती

    कुजबुज करिती राघू मैना

    ताना मारित कोकीळ गाती

    कुक्कुटाची ती बांग तुतारी

    आरंभ करिती पक्षीगीतांचे //३//

    स्वागत करुया रविउदयाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 5, 2021