(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ठशांचं ‘वय’

    दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होऊ शकेल. यासाठी ठशांचं ‘वय’ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं चालू आहेत; परंतु संशोधकांना यात अजून यश आलेलं नाही. मात्र नजीकच्या भविष्यकाळात हे शक्य करणारं संशोधन, अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठातील यंग जीन ली यांनी अलीकडेच केलं आहे. यंग जीन ली यांनी अँड्रयू पॉलसन यांच्या सहकार्यानं केलेलं हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘सेंट्रल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. हे संशोधन म्हणजे यंग जीन ली यांनी तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्वतःच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे.

    आताच्या या अभ्यासात या संशोधकांनी एकाच व्यक्तीच्या बोटांचे चौदा ठसे घेतले. त्यानंतर हे ठसे ज्या काचांवर घेतले, त्या काचा प्रयोगशाळेतच, परंतु उघड्यावर ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रयोगाच्या काळातलं, प्रयोगशाळेतलं तापमान, आर्द्रता, हवेतील ओझोनचं प्रमाण, इत्यादी सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवली. त्यानंतर त्यांनी, या चौदा ठशांचं वेगवेगळ्या दिवशी रासायनिक विश्लेषण केलं. सुरुवातीला मोजक्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण असणाऱ्या या पदार्थांना, हवेतल्या ओझोनशी झालेल्या रासायनिक क्रियांमुळे अधिकाधिक गुंतागुंतीचं स्वरूप येऊ लागल्याचं या संशोधकांना आढळलं. या ठशांतील ट्रायअसाइलग्लिसेरॉल या रसायनाचं प्रमाण सात दिवसांत, तर स्क्वॅलिन या रसायनाचं प्रमाण तीन दिवसांत लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर या रासायनिक क्रियांत तयार होणाऱ्या डेकॅनॉइक आम्लासारख्या स्निग्धाम्लांचं, तसंच इतर अनेक रसायनांचं प्रमाण वाढत गेलं होतं. ओझोनशी क्रिया होऊन नष्ट होणाऱ्या रसायनांची, तसंच या क्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनांची, त्यांच्या प्रमाणानुसार तपशीलवार माहिती या विश्लेषणातून मिळाली. यांतील कोणत्या रसायनांच्या प्रमाणात काळानुरूप होणाऱ्या बदलाचा, ठशांचं वय काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज या संशोधकांना येऊ शकला.

    यंग जी लीन आणि अँड्रयू पॉलसन यांचे हे प्रयोग प्राथमिक स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं यापुढचे प्रयोग केले जाणार आहेत. याशिवाय पुढचे प्रयोग हे अनेक व्यक्तींवर केले जाऊन, त्यांतून सर्वंकष स्वरूपाची माहिती गोळा केली जाईल. या माहितीच्या विश्लेषणासाठी वेगळी संगणकीय पद्धतीही विकसित केली जाईल. त्यामुळे या तंत्रातील अचूकता वाढून, गुन्ह्याच्या तपासातील अचूकताही वाढण्याची खात्री या संशोधकांना वाटते आहे. किंबहुना फक्त हे संशोधकच नव्हे तर, गुन्ह्यांचा शोध घेणारे तज्ज्ञही या तंत्राबद्दल अपेक्षा बाळगून आहेत. अमेरिकेतल्या व्हर्जिनिआ राज्याच्या न्यायवैद्यक विभागातील रसायनशास्त्रतज्ज्ञ कार्ल डेसिल यांनीही, यंग जीन ली आणि अँड्रयू पॉल यांचं हे संशोधन, गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या तंत्राचं प्रमाणीकरण होण्यास काही वेळ लागणार आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात होत असलेली प्रगती पाहता, हा काळ फार मोठा असणार नाही हे नक्की!

    (छायाचित्र सौजन्य - byrev/Pixabay and Young Jin Lee, et al)

      February 7, 2023


  • मंगळावरचे आवाज

    बॅप्टिस्ट चाइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून मंगळावर आवाजाला ‘दुहेरी’ वेग असल्याचं तर दिसून आलं आहेच; परंतु त्याचबरोबर आणखी एक गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, सर्वच प्रकारच्या आवाजाच्या वेगात दिवसातील वेळेनुसार होणारा लक्षणीय बदल. मंगळावरच्या सकाळनंतर सर्वच ध्वनिलहरींचा वेग हळूहळू वाढत जाऊन मध्यान्हीच्या सुमारास तो कमाल पातळी गाठतो. त्यानंतर कमी होत-होत संध्याकाळपर्यंत तो बराच कमी झालेला असतो.

      August 20, 2022


  • हाय डेफिनेशन टीव्ही (एचडीटीव्ही)

    हाय डेफिनेशन टेलिव्हिजन याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असा आहे. पारंपरिक टीव्हीवरील चित्रापेक्षा यावरील प्रतिमा अधिक स्पष्ट असतात कारण त्यात प्रत्येक चित्रचौकटीत १० ते २० लाख रंगबिंदू म्हणजे पिक्सेल असतात.

      September 26, 2023


  • आधुनिक लाक्षागृहे

    अभय गुजर गगनचुंबी इमारतींतील ‘अग्नी सुरक्षा’ ही नेहमीच चिंतेची बाब असते. नुकत्याच लागलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’मधील आगीच्या तांडवात ही बाब प्रकर्षाने ऐरणीवर आली आहे. अग्निशमन यंत्रणांच्या नियमांच्या अंमलबजावणीतील पळवाटा शोधण्याच्या वृत्तीमुळे अशा इमारतींत वावरणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या ‘आधुनिक लाक्षागृहां’चा घेतलेला हा जळजळीत लेखाजोखा…

      January 24, 2024


  • संगणकाचे ‘शरीरशास्त्र’

    संगणकाचे हार्डवेअर म्हणजे संगणकाचे विविध भाग. हे विविध भाग संगणकाचे अवयवच असतात. मानवी शरीराच्या अवयवांप्रमाणेच संगणकाचे हे अवयव विशिष्ट कामे पार, पाडत असतात. कालानुरूप या हार्डवेअरच्या स्वरूपात बदल होत गेले असले, तरी त्यांचे कार्य तेच राहिले आहे. संगणकाची ओळख करून घ्यायची तर संगणकाच्या या हार्डवेअरची माहिती हवीच…

      August 27, 2023


  • भूस्थिर उपग्रह

    कृत्रिम उपग्रहांमुळे मानवी जीवनात अनेक गोष्टी पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो व तो पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. त्याची पृथ्वीभोवती फिरण्याची गती व दिशा (पश्चिमेकडून पूर्वेकडे) ही पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याची गती व दिशा यांच्या समान असते.

      October 21, 2023


  • अंटार्क्टिकातले वणवे

    पृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं.

      January 4, 2022


  • इ-बुक रीडर

    हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते.

      September 22, 2023


  • शुष्क बर्फ

    बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे ५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ.

      November 14, 2023


  • सीसीटीव्ही (क्लोज सर्किट टीव्ही)

    अगदी छोट्या दुकानांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडेच ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपकरण लावलेले असते ते म्हणजे क्लोज सर्किट टीव्ही. त्याच्या मदतीने आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. किंबहुना रस्त्यांवरही महत्त्वाच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावलेले असतात. टेहळणी हा सीसीटीव्हीचा एक प्रमुख उपयोग आहे.

      August 30, 2023