(User Level: User is not logged in.)

विज्ञान / तंत्रज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवमाशांचा माग

    देवमाशांचा माग

    देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात.

      April 8, 2024


  • किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

    जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

      October 2, 2023


  • एअरबॅग

    कुठलाही मोठा आघात हानिकारक असतो. मोटारींना जेव्हा अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा अफाट वेग हेच त्याचे कारण असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण आपण पाहतोच आहोत. झोपेच्या वेळी गाडी चालवणे (पहाटे १२ ते ५) हेही त्याचे एक मोठे कारण आहे.

      October 8, 2023


  • क्लाउड कॉम्प्युटिंग

    एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी हार्डवेअर (संगणक व यंत्रसामुग्री) व सॉफ्टवेअर (आज्ञावली) उपलब्ध करून द्यावी लागते. केवळ प्रत्येकाला संगणक देऊन भागणार नाही तर सॉफ्टवेअर लायसन्स घ्यावे लागेल. जर नवीन कर्मचारी भरती झाला तर पुन्हा त्याच्यासाठी सॉफ्टवेअर व हार्डवेअर घ्यावे लागेल.

      September 3, 2023


  • डीएनएचे उपयोग

    डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू.

      November 16, 2023


  • अजून त्या झुडपांच्या मागे

    फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात.

      March 21, 2025


  • बदमाश लाटा

    समुद्रातील लाटांची उंची मोजण्यासाठी वेगवेगळी तंत्रं वापरली जातात. त्यातल्याच एका तंत्रानुसार संवेदक बसवलेल्या बोयऱ्यांचा वापर केला जातो. हा बोयरा म्हणजे पाण्यावर तरंगणारी डब्यासारखी एक वस्तू असते. या बोयऱ्यावरील संवेदक, लाटांमुळे होणाऱ्या बोयऱ्याच्या हालचालींची नोंद करतो. या नोंदींवरून त्या ठिकाणच्या लाटांची उंची कळू शकते. संवेदकानं मिळवलेली माहिती, जागतिक स्थानदर्शक यंत्रणेतील उपग्रहांद्वारे संशोधकांपर्यंत पोचते.

      March 24, 2022


  • सॅटेलाईट फोन

    सॅटेलाईट फोन हा एक प्रकारचा मोबाईल फोनच असतो, पण तो सेल साईट्सच्या ऐवजी उपग्रहांना जोडलेला असतो. त्याच्या मदतीने आपण नेहमीचे फोन कॉल्स करू शकतो, शिवाय एसएमएस व कमी तरंगलांबीवर आधारित इंटरनेट अशा सेवा त्यावर उपलब्ध आहेत.

      September 16, 2023


  • द्विनेत्री (बायनॉक्युलर्स)

    प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्समध्ये कॅमेरा, दुर्बीण यांच्याखालोखाल सर्वांत लोकप्रिय उपकरण म्हणजे द्विनेत्री त्यालाच बायनॉक्युलर असे म्हणतात. बहुतांश लोक अशा बायनॉक्युलरचा वापर क्रिकेट सामने पाहताना किंवा पक्षी निरीक्षणसाठी करीत असतात. एका नेत्रिकेची दुर्बीण जे दाखवते त्यापेक्षा अधिक दोन नेत्रिका असलेल्या बायनॉक्युलरमुळे आपल्याला दिसत असते.

      October 13, 2023


  • हायसिन – जीवसृष्टीयोग्य ग्रह

    प्रा. सारा सिगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनानं, ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्यासंबंधीच्या निकषांना वेगळंच वळण दिलं. हायड्रोजनयुक्त वातावरण असलेले ग्रहही जीवसृष्टीसाठी योग्य असू शकण्याची शक्यता या संशोधनावरून दिसून आली. विश्व हे नव्वद टक्के हायड्रोजननं भरलेलं असल्यानं, पृथ्वीपेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या अनेक ग्रहांवर हायड्रोजनयुक्त वातावरण असण्याची शक्यता बरीच आहे.

      February 1, 2022