कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही!
April 9, 2022
राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.
October 20, 2021
११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली.
October 11, 2020
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.
December 24, 2021
कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे.
October 7, 2021
या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या विवाहाच्या किमान वयाचा कायदा करावा लागला. तो आजतागायत लागू आहे.
January 13, 2022
युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो.
January 29, 2022
बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो.
March 19, 2022
एका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. तपन सिन्हा दिग्दर्शित ‘Galpo Holeo Satti’ (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
July 7, 2021
या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली.
November 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti