(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय यांनी युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित केले

    राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.

      March 1, 2024


  • कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

    मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.

      May 31, 2023


  • सायकल डे

    सध्याच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमान वाढत आहे. याशिवाय वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागतो. दिल्लीमध्ये सम-विषमचा प्रयोग केला गेला. भविष्यात ही परिस्थिती आपल्याही शहरात ओढावणार आहे. हे रोखण्याकरिता सायकलिंग करणे सर्वांत चांगला व आरोग्यदायी उपाय असून, प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालविण्याचा निर्धार करावा. समाजात बदल हवा असल्यास त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि व्यक्तीं नी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची व सायकलिंगमुळे होणारे फायदे समाजवून सांगितले पाहिजे. एवढेच करून चालणार नाही, शहरातील मार्केट, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सायकल पार्क करण्याची व्यवस्था असावी. सायकल संस्कृती रुजविताना जी वागणूक रस्त्यावरून मोटारसायकल, कार चालविणाऱ्यांना मिळत तीच सायकलिंग करणाऱ्यांना मिळाल्यास सायकल चालविण्याकडे नागरिकांचा कल वाढविण्यास मदत होईल. पालक पाल्यांना ५० ते ६० हजार रुपयांची मोटारसायकल घेऊन देतात. पण, दहा हजार रुपयांची सायकल घेऊन देत नाही. कारण ते त्यांना प्रतिष्ठेचे वाटत नाही. मोटारसायकलच्या किमतीपेक्षा महागड्या सायकल मिळतात. त्याने आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत व पैशाची बचत आणि अपघातांना पायबंद लावणे शक्या होते. परंतु, ते सर्व या माहितीपासून अनभिज्ञ आहेत.

    जगातील बऱ्याच देशात सायकलिंगला वेगळे स्थान आहे. नेदरलॅण्डमध्ये वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर केला जातो. विशेष म्हणजे तिथे सायकल चालविणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता यासर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. १८८० च्या दरम्यान पहिल्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि नंतर संपूर्ण युरोपमध्ये आवश्यकतेनुसार सायकलसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उभारल्या गेल्या. अलीकडच्या काळात तर सायकलिंगचे वाढलेले महत्त्व लक्षात घेता सायकलसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती हा शहराच्या नियोजनाचा भाग झाला आहे. सायकलस्वारांसाठी वेगळे ट्रॅक, सिग्नल व्यवस्था, पाìकग, नियम, कायदे आणि आवश्यक प्रशिक्षणाचा त्यामध्ये समावेश असतो. एवढेच नव्हे तर लहानपणापासूनच सायकलिंगबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. युरोप आणि अमेरिकेत गेल्यावर आपल्याला त्याचा पावलोपावली प्रत्यय येतो. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकलस्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पाìकगची आखणी केली जाते. नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणाऱ्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत.

    टोकियो शहरामध्ये जमिनीखाली सायकल पाìकगतळाची निर्मिती करण्यात आली असून दोनशे सायकल पार्क करण्याची सुविधा आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा हा उपाय सरस आहे. जर्मनीमध्येही जुन्या रेल्वे ट्रॅकवर तब्बल नव्वद किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारणीचे काम सुरू आहे. अशाच प्रकारच्या सोयी सुविधा आपल्या शहरात मिळाल्यास निश्चिधत चांगले बदल दिसून येईल.

    भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मात्र देशात सायकलसाठी म्हणून काही विशेष पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे फारसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. सायकलिंगबद्दलचे प्रेम वाढत आहे याबाबत शंका नाही. परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.
    आज सायकल दिना निमीत्त प्रतीज्ञा करा.

    मी आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करीन.
    सायलक पार्क करण्याची व्यवस्था व ती सहज उपलब्ध व्हावी
    ती घेण्यासाठी कर्ज मिळण्याची सुविधा - सायकलचा विमा असावा
    सायकलिंगचे फायदे सांगण्यासाठी शिबिर, रॅली, काढावी सर्व काॅर्पोरेट कंपन्यानी कर्मचाऱ्यांना एक दिवस सायकलने येण्याचा सल्ला द्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 20, 2017


  • मिरॅकल ऑफ सेंच्युरी

    मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी पॅरिस मध्ये त्यांच्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता सिद्ध केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

      July 7, 2021


  • राष्ट्रीय नूडल्स दिवस

    नूडल्सचा संदर्भ हा चीनपासून लागतो. हळूहळू याला जपानी खाद्यसंस्कृतीत व ‘हाँग’च्या कृपेने तैवान खाद्यसंस्कृतीतदेखील स्थान मिळू लागले. भारतात नूडल्स हे सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाल्ले जातात.

      October 6, 2021


  • भावबंधन नाटकाची १०१ वर्षं

    राम गणेश गडकरी यांचे भावबंधन नाटक १८ ऑक्टोबर १९१९ रोजी ‘बलवंत संगीत मंडळी’ ने रंगभूमीवर आणले याला आज १०१ वर्षे झाली.

      October 18, 2021


  • जागतिक तंबाखूविरोधी दिन

    तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे.

      May 31, 2022


  • फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड

    "मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे." ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. त्यांचा जन्म ३० जुलै १८६३ रोजी झाला.

    "हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल." असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले. हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.

    समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला.अमेरिकेतला हा पहिला परवाना होता.
    हेन्री फोर्ड यांचे ७ एप्रिल १९४७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / विनोद शिवाजी गोरे

      July 30, 2021


  • महाकवी कालिदास दिवस

    कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच… पण तो चित्रकारही होता…एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता….

      June 30, 2022


  • सातवा राष्ट्रीय हॅन्डलूम दिवस

    केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते.

    हातमाग उद्योगाला अच्छे दिन

    खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत. यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे.

    ज्याचे काम त्यानी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी,चांभारानी चपला शिवाव्यात,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे. मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे. त्या कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते.

    उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला.

    इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला होता. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती .

    यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते, याची जाणीव होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती. मात्र झाले उलटेच. खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली. ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो. तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही. आज ही या समाजातील ४३ लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात.

    ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, या राष्ट्रीय हॅण्डलूम दिवसा मुळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते.

    - नागोराव सा. येवतीकर

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021