पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.
July 12, 2021
इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
November 15, 2021
मैने प्यार किया या चित्रपटाला प्रदर्शीत होऊन तब्बल २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. २९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शीत झाला. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. सलमान खानच्या अभिनय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 'मैने प्यार किया'. रॉयल मराठी कुटुंबात वाढलेल्या भाग्यश्रीनेही याच चित्रपटाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्याकाळी यशाचे अनेक रेकॉर्ड तोडले. यातील कलाकार सलमान खान आणि भाग्यश्री यांना या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटादरम्यान प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आलेले सूरज बडजात्या यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी सेटवर सर्वात अगोदर येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे ते एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या सवयीमुळे सलमान आणि भाग्यश्री त्यांना पत्नीसोबत वेळ घालवण्याचा सल्ला देत असत. पण कामाला पूर्णपणे वाहून घेतलेले सूरज यांचा सेटवरील दिनक्रम चुकत नसे. सलमान आणि भाग्यश्री सेटवर धमाल मस्ती करण्याचा एक क्षणही सोडत नसत.
मूळचे वाशीम येथील आणि आता मुंबईत वास्तरव्या स असलेले मराठमोळे लेखक एस.एम.आहाळे यांच्या् लेखनीतून 'मैंने प्यार किया' साकारला आहे. आहाळे यांना बाल्याेवस्थेकपासूनच नाटकाची आवड होती. त्यायतून ते नट होण्यापसाठी मुंबईला गेले. मात्र,तिथे अभिनेत्याचऐवजी स्क्री प्टण राइटर म्हचणून त्यांयनी लौकिक मिळवला. त्यांोनी 'हम आपके है कोन','एक रिश्ताब','प्यायर दिवाना होता है','दिल ने फिर याद किया',यासह इतर अनेक चित्रपटांचे लेखन केलेले आहे. या शिवाय 'एक से बढकर एक' या लोकप्रिय मालिकेसह इतर अनेक हिंदी मालिका लिहिल्याात.
मैंने प्यार किया’मधील रिमा लागू यांनी साकारलेली आई आजही अनेकांच्या लक्षात आहे. मातृत्व आणि पत्नी धर्म यांमध्ये अडकलेली आई रिमा यांनी चांगलीच साकारली होती. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की, रिमोट आपसूक बाजूला ठेवून सिनेमा पाहिला जातो. या सिनेमामुळे रिमा यांच्या करिअरला नवीन उभारी मिळाली.
सलमान खाननेही नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यातही सलमान आणि रिमा यांच्या वयात फारसे अंतर नव्हते. रिमा या सलमानपेक्षा फक्त आठ ते नऊ वर्षांनीच मोठ्या होत्या. या सिनेमावेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. अशात सलमानची आई साकारणं तसं आव्हानच होतं. पण सुरज बडजात्या यांनी या सिनेमात बॉलिवूडपटात दाखवतात तशी टिपिकल केस पांढरे असलेली, खंगलेली आई न दाखवता रिमा लागू यांच्या लूकवर काम केले आणि देशाला नवीन आईची ओळख करून दिली. पण मेकअपच सगळं काही करतो असे नाही ना.. रिमा लागू यांनी त्यांच्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अशापद्धतीने साकारली की आजही ‘मैंने प्यार किया’ म्हटलं की रिमा यांची ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोरून जात नाही.
अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सूक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या आॅफर्स आल्यात पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्यात. का? तर याच ‘का’चे उत्तर भाग्यश्रीने दिले आहे. एका मुलाखतीत भाग्यश्रीने ‘का’वर मौन तोडले. ‘मैंने प्यार किया’ भाग्यश्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाली, याचे कारण आहे, तिचे प्रेम. होय, बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्या प्रेमामुळे भाग्यश्रीने चित्रपटांच्या आॅफर्स नाकारल्या. तिने सांगितले की, ‘मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र.
आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. कारण आज नसलो तरी उद्या मी व हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही त्याला स्विकारायला तयार नव्हते. एकदिवस मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या असे मित्र आमच्या लग्नात हजर होते. तोपर्यंत ‘मैने प्यार किया’ सुपरहिट झाला होता. मला खूप आॅफर आल्यात. पण हिमालयच्या प्रेमात मी आकंठ बुडाले होते. शिवाय लग्नानंतर लगेच अभिमन्यूचाही जन्म झाला.
याच कारणामुळे मी सगळ्या आॅफर्स नाकारत गेले. अर्थात मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही.’ १९९१ मध्ये आलेल्या‘ मैंने प्यार किया’साठी भाग्यश्रीला बेस्ट डेब्यूचा अवार्ड मिळाला होता. यानंतर तिने तामिळ, तेलगू, भोजपूरी अशा काही चित्रपटांत काम केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मैने प्यार किया चित्रपट.
https://youtu.be/l62WNDstEpc
December 29, 2018
आर्यन’ १९१५ साली सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणाऱ्या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.
February 7, 2022
देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.
October 27, 2021
रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इ.स. १७८४ मध्ये पोस्टाची पत्रे घेऊन जाणाऱ्या घोडागाड्यांचे वेग वाढविण्यासाठी रस्त्यांमधे लाकडी फळ्या अंथरून त्यावरून या घोडागाड्यांना पळविले जाई.
March 13, 2023
कर्करोगाच्या संभाव्य कारणांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि कर्करोगाच्या प्राथमिक स्तरावर ओळखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हे याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
November 7, 2021
मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.
April 20, 2022
अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता.
February 4, 2022
स्विगी.! झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी..! १४ ऑगस्ट २०१४ ला सुरु झालेली ही कंपनी. अल्पावधीतच ग्राहकांच्या लोकप्रियतेला पात्र ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची स्थापना नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्ष मजेती या तिघांनी केली. यातील नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती हे दोघे बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीचे विद्यार्थी.
या दोघांनी 'बंडल' नावाची कुरिअर लॉजिस्टिक्स कंपनी सुरु केली. वर्षानंतर लोकल हॉटेल व्यावसायिकांशी जोडुन फुड ऑर्डर डिलिव्हरीची सुरुवात केली. आयआयटी खरगपूर येथे शिकणाऱ्या राहुल जेमिनी यांच्याशी या दोघांची ओळख झाली. राहुल हे 'मिंत्रा'चे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती. असे तिघे मिळवून स्विगी चालवू लागले.
स्विगीवर बिर्याणी, बटर नान, फ्राइड राईस हे पदार्थ सर्वाधिक मागविले जातात. ५७% ऑर्डर्स वेब तर ४३% ऑर्डर्स या अॅइपच्या माध्यमातून दिल्या जातात. स्विगीच्या एका आकडेवारीनुसार ५५,०००+ हॉटेल्स, १,२०,०००+ डिलिव्हरी पार्टनर्स, ५,०००+ मनुष्यबळ कार्यरत आहेत. आज स्विगी कंपनीचे बाजारमुल्य ३.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. अॅसपचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते जगभरात आहेत. १५ हुन अधिक आर्थिक संस्थांनी भांडवल स्वरूपात १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा अधिक मदत केली आहे.
स्विगीच्या अॅीपमध्ये मुख्य गोष्टी तीन. पहिली ग्राहक, दुसरी डिलिव्हरी पार्टनर्स, तिसरी हॉटेल्स!
५००० ते ७५०० ग्राहक प्रतिदिन या अॅयपवर फुड ऑर्डर करतात. ग्राहकांना वेगवेगळे कॅशबॅक देऊन आकर्षित केले जाते. ग्राहक त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे ऑर्डर करू शकतो. मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर्स दिल्या जातात. अॅडपवर येणाऱ्या ऑर्डर्समधून ग्राहकाचा खाण्यापिण्याचा ट्रेंड शोधला जातो. त्यानुसार पुढील वेळी त्याच्या आवडीच्या हॉटेलचे अन्नपदार्थ स्क्रीनवर दाखवले जातात. ग्राहकांकडून किरकोळ स्वरूपात डिलिव्हरी चार्जेस आणि पॅकेजिंग चार्जेस आकारले जातात. जर आपण प्रीमियम सभासद असाल तर हे चार्जेस आकारले जात नाहीत. सांगलीत जवळपास ४०० हून अधिक युवकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामध्ये तरुण वर्गापासून आबालवृद्ध लोक कार्यरत आहेत.
पार्ट टाईम तसेच फुल टाईम अशा वेळेत काम करू शकता. जॉबला लागल्यानंतर सर्वसाधारणता १,००० रु. भरावे लागतात. (दोन्ही कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत.) दर आठवड्याला कामाचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होतात. फुल टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ८,००० ते रु. १५,००० दरम्यान पगार मिळतो. पार्ट टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ६,००० ते रु. ११,००० दरम्यान पगार मिळतो.
ऑर्डर्स ऑनलाईन येत राहतात. त्याप्रमाणे त्या स्वीकारून हॉटेलमधून घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जातात. हॉटेल्सकडून या कंपन्या १०-२५% कमिशन चार्ज आकारतात. हॉटेल चालकांना एकसलग ऑर्डर्स मिळतात म्हणून ते देखील आनंदाने पैसे देऊ करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti