एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
March 9, 2022
पानिपत हे ठिकाण गेल्या सहस्त्रकात फारच गाजलेले आहे. इथे लढल्या गेलेल्या तीनही लढायात स्थानिक राज्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आणि परकीय आक्रमकांचे विजय झाले. त्यामुळे पानिपतची रणभूमी ही परधार्जिणी आहे असे म्हटले जाते.
January 14, 2022
२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
March 26, 2021
४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
May 5, 2021
संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
November 16, 2021
तृतीय पंथी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्या मुळे त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल व अधिक महत्त्वाचे व आनंदाचे हे की त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे बंधनकारण रहाणार नसून ‘इतर’/’तृतीयलिंगी’ व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येऊ लागले. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तर्फे तृतीय पंथी ओळख सप्ताह पाळला जातो.
March 31, 2022
आजच्या दिवशी १९४२ साली भारत छोडो चा ठराव पास करण्यात आला.
७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे गवालिया टँक (क्रांती मदान) येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरूवात ९ ऑगस्ट १९४२ ला सुरू झाली.
चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा १२ कलमी होता. ८ ऑगस्ट, १९४२ च्या रात्री महात्मा गांधी, मिराबेन, कस्तुरबा गांधी यांना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले, तसेच पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोिवद वल्लभपंत यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुस्लिम लीगने सरकारशी हातमिळवणी केली होती. चळवळीच्या काळात राष्ट्रसभा बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. राष्ट्रसभेचे बँक खाते गोठविण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 8, 2021
सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं जीवनविश्वही वेगळंच असतं. इथं काम करणारे कलाकार हे स्वयंप्रेरणेन आलेले असतात. ते विविध प्रांतांतून, देशातून आलेले कलाकार म्हणजे ते एक कुटुंबच असतं. त्यामुळं त्यांच्यात एक कौटुंबिक ओलावा असतो. सर्वसाधारणपणं रशियन सर्कस जागतिक पातळीवर श्रेष्ठ म्हटली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे शोमॅन दिवंगत राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटानंच सर्कशीचं अंतरंग उलगडून दाखवताना ‘दुनिया एक सर्कस है’ हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवलं.
April 16, 2022
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे.
December 11, 2021
अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था – संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचाही ही संस्था उत्तम उपयोग करून घेते. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारावर अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सातत्याने नव्या मुद्दय़ांची भर घातली जाते. अशा प्रकारचे नानाविध अभ्यासक्रम आणि विषय नव्या-जुन्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे, तर व्यवहाराच्या पातळीवरही तितकेच उपयुक्त ठरत आहेत. शेतीविषयक उद्योगधंद्यांमधील तसेच उद्योगांच्या अर्थकारणाचे बारकावेही या संस्थेच्या अभ्यासक्रमामधून जाणून घेता येतात. संस्थेमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ॲ्प्लिकेशन्स इन इकॉनॉमिक ॲतनालिसिस हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे. संस्थेमध्ये एम. एस्सी. अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान इंटर्नशिपचा काळ पूर्ण करावा लागतो.
June 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti