भारतीय अभिजात संगीत

संगीत हे मानवाच जीवनावश्यक असे घटक आहे. कारण भारतीय अभिजात संगीत हे पुरातन काळापासून देव दैत्य दानव अशा प्रत्येक व्यक्तीला आवडणारे व त्यात प्राविण्य असणारे असे हे संगीत आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि तोच वारसा घेऊन आम्ही हे संगीत पुढे नेत आहोत. ज्यात आमच्या म्हणजे मानवाच्या प्रत्येक एक्टिविटी मध्ये संगीते अत्यावश्यक आहे .



संगीत हे मानवाच जीवनावश्यक असे घटक आहे. कारण भारतीय अभिजात संगीत हे पुरातन काळापासून देव दैत्य दानव अशा प्रत्येक व्यक्तीला आवडणारे व त्यात प्राविण्य असणारे असे हे संगीत आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि तोच वारसा घेऊन आम्ही हे संगीत पुढे नेत आहोत. ज्यात आमच्या म्हणजे मानवाच्या प्रत्येक एक्टिविटी मध्ये संगीते अत्यावश्यक आहे .

उदाहरणार्थ आपण मैदानावरची खेळ घेऊन या खेळामध्ये सुद्धा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्हाला संगीताची गरज असते दुसरे उदाहरण जे काय आम्ही उत्सव करतो उदाहरणार्थ गणेशोत्सव दुर्गादेवी उत्सव तसेच इतर सार्वजनिक व घरगुती उत्सवात आम्हाला संगीताची गरज असते संगीत हे मानवाच्या प्रत्येक कार्यामध्ये आवश्यक आहे कितीतरी उदाहरणे देता येतील मानवाच्या शारीरिक मानसिक भावनिक संस्कार उत्सव आणि त्याला आवश्यक असणाऱ्या मानसिकते साठी संगीत आवश्यक आहे. तसेच प्राणायाम, योगा ,व्यायाम ह्यासाठी सुद्धा संगीताची गरज आहे. अजून मुख्य सांगायचं म्हटलं तर अगदी नर्सरी पासून विद्यार्थ्याला अगदी एबीसीडी तसेच कखग एक-दोन-तीन-चार तसेच प्राण्यांची नावे फळांची नावे ह्या सर्व गोष्टी शिकवण्यासाठी आम्हाला संगीताचा आधार हा खूप महत्त्वाचा ठरतो कारण त्यामुळे त्या विद्यार्थ्याला ही गोष्ट सहजगत्त्या समजायला मदत होते आमच्या घरात लहान बाळाला जे काही संस्कार करण्यासाठी किंवा त्याच्या दुखापतीतून त्याला विसर पडावा यासाठी किंवा त्याला गाढ अशी छान झोप लागावी यासाठी सकाळ-संध्याकाळ देवा पुढे जाऊन त्याने सकाळी बाप्पाला काय म्हणावे संध्याकाळी बाप्पाला काय म्हणावे ह्या सर्व गोष्टी संगीताच्या माध्यमातून शिकवल्या जातात मग आम्हाला तरीसुद्धा संगीत हे मनोरंजन एवढेच आहे असं का वाटते? यात काही लोकांचा प्रश्‍न असेल की नाही आम्ही संगीताकडे तसं बघत नाही पण ही मंडळी खूप कमी बोटावर मोजण्याइतकी आहेत बाकी सर्व मंडळी संगीताकडे मनोरंजन म्हणूनच आजही पाहतात मला असे सांगा वेसे वाटतं की आज हायपर टेन्शन डिप्रेशन तसेच चर्मरोग, डोकेदुखी,उच्च रक्तदाब असे किती तरी आजार आहेत की जे संगीतथेरेपीमुळे बरे होतात अशी हजारोने उदाहरण बघायला मिळतात म्हणून संगीत हे मनोरंजन नाही तर हे सुद्धा एक मानवाच्या दृष्टीने अत्यावश्यक असे साधन आहे. तुम्ही घरात एक प्रयोग करून बघा टीव्ही बंद, मोबाइल बंद असा काहीही आवाज नाही, काहीही नाद नाही असं तुम्ही किती वेळ राहू शकता जरा करून बघा काही वेळाने तुम्हाला ते असह्य होईल नाद विना शक्य नाही असं वाटायला लागेल कारण एवढा एकांत सहनच करू शकत नाही पुढच्या क्षणाला तुम्हाला संगीताचा आधार घ्यावा लागेल नादाचा आधार घ्यावा लागेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की संगीतातील नाद हा मानवाला किती अत्यावश्यक आहे .म्हणजे आमच्यातला एक घटक आहेस तू मग का त्याला योग्य तो दर्जा दिला जात नाही एखादा व्यक्ती संगीत शिकतो एक तर तो स्वतःच्या मनोरंजनासाठी शिकतो, आत्मिक समाधानासाठी शिकतो किंवा एखादा व्यक्ती आपलं करियर त्यात घडवतो प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक कलाकारच हा काही सेलिब्रिटी होऊ शकत नाही किंवा होत नाही मग आमचा सामान्य कलाकार तसाच राहतो छोटे-मोठे काहीतरी काम करतो आणि त्यात आपला संसारिक निवारा चालवतो मग आमच्या संगीताला आणि अभिजात संगीत त्याला योग्य तो दर्जा का मिळत नाही की ज्या संगीतामुळे लहानपणापासून ते स्मशानात जाण्यापर्यंत त्याला उपयुक्त ठरतं त्या संगीतात प्रत्येक शाळेत काय अगदी नर्सरी पासून ते डिग्री घेईपर्यंत का कंपल्सरी केले जात नाही? संगीताला एवढं दुय्यम स्थान दिलं जात अगदी मतदार राज्याला आपला निरोप पोहचवण्या साठी सुद्धा संगीताचा आसरा घेतात तेवढ्या पुरत संगीताला तेव्हा किंमत देतात पण नंतर का नाही हो बघू हो करू असं फक्त आव्हान असतात मग पण यावर खरोखर विचार करण्याची गरज आहे जगात भारतीय संगीत हे एकमेव असे संगीत आहे की आमच्या प्रत्येक संस्कारावर ह्या संगीतात गीत आहे त्या गीताद्वारे त्याच्यावर ते संस्कार केले जातात बालपणापासून मंदिरापर्यंत शाळेत एखाद्या ऑफिस मध्ये रिटायरमेंट किंवा नवीन लागलेल्या व्यक्तीचे स्वागत किंवा एखादी व्यक्ती चांगलं कार्य केला असेल तर त्याचं आनंद साजरा करण्यात पर्यंत अशा सगळ्या ठिकाणी संगीताचा उपयोग होतो तर मग या संगीताकडे आम्ही का प्रेमाने बघत नाहीये फक्त त्याला मनोरंजन म्हणून ठेवून बाजूला केले आहे भारतात प्रत्येक शहरामध्ये शेकडोंनी क्लासेस चालतात शेकडो विद्यार्थी परीक्षेतून पास होतात परंतु त्याला अशी कुठली युनिव्हर्सिटी विद्यापीठ हमी देऊ शकत नाही की तू ही डिग्री मिळवल्यानंतर तुला नोकरी आम्ही देऊ किंवा तुला नोकरी मिळेल. त्यासाठी त्याला दुसऱ्या विषयांची कुबडी घ्यावी लागते आणि आवड म्हणून संगीत विषय ठेवून त्याला दुसऱ्या विषयात नोकरी करावी लागते ही खूप दु:ख द गोष्ट आहे आम्ही संगीतकार संगीत क्षेत्रातील आमचे बुजुर्ग यांनी अहोरात्र संगीताची सेवा केली अहोरात्र संगीतातल्या प्रत्येक गोष्टी जपून ठेवून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत त्या कलाकाराला आपल्या स्वतःच्या मेहनती शिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्याच्यासमोर आला नाही खूप कमी मंडळी आहे की ज्यांना नोकऱ्या मिळाल्या किंवा मिळतात कारण आम्ही एका शाळेसाठी एक संगीत शिक्षक त्यातही एवढी विद्यार्थी संख्या असेल तर संगीत शिक्षक केवढी वाईट गोष्ट आहे की ज्या गोष्टीवर आमचे संस्कार उभे ठाकले आहेत किंवा ज्या गोष्टीतून आम्हाला संस्कार मिळतात त्या गोष्टीला एवढं दुय्यम स्थान घेतला गेला आहे आणि यावर कुठलाही संगीतप्रेमी म्हणजे सत्तेत असलेला व्यक्ती आज पर्यंत ठाम पणे निर्णय घेऊ शकला नाही घेतील की नाही शंकाच आहे किती वर्षापासून किती संस्थांमध्ये जागा रिक्त आहेत परंतु त्या भरल्या जात नाहीत भरल्या जातील की नाही शंकाच आहे परंतु ह्या भारतीय अभिजात संगीताकडे अगदी लहान कलाकार पासून मोठ्या कलाकारांपर्यंत तसेच खेड्यातल्या कार्यकर्त्या पासून दिल्लीपर्यंत अश्या सर्व मंडळींनी बघणे गरजेचे आहे कारण आज आमच्या देशात पाश्चात्त्य संगीत नावाचं जो काय व्हायरस घुसलेला आहे तो अजून काही वर्षांनी अभिजात संगीताचा नायनाट करेल यात काहीही शंका नाही कारण आत्ताच आमच्या जी पिढी चालते आहे त्यातली दहा टक्के 15 टक्के 20 टक्के मंडळीस फक्त भारतीय संगीत ओळखत बाकी सगळी मंडळी पाश्‍चात्त्य संगीताच्या ओढ्यात आहे हे तेवढेच सत्य आहे.

— पुंडलिक कोल्हटकर
9552554697

Author