सुप्रसिद्ध कवी अनिल
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकवि अनिल यांनी १९३० च्या सुमारास काव्यलेखनास सुरवात केली. त्या काळात जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या रवीकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा त्यांची कविता वेगळी असल्यामुळे लोकांना ती आवडली. त्यांची सुरवातीची कविता ऋजू , भावपूर्ण , सौम्य शब्दाच्या कलेची होती. ‘फुलवात’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर तीन वर्षाने आलेल्या ‘ प्रेम ‘ आणि ‘ जीवन ‘ या संग्रहात त्यांनी मुक्तछंदात दीर्घ कविता लिहिली त्यामुळे कवि अनिल मराठी मुक्तछंदात्मक कवितांचे प्रणेते समजले जातात. त्यानंतर त्यांनी कला आणि संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर भाष्य करणारे ‘ भग्नमूर्ती ‘ हे खंडकाव्य लिहिले .