खाद्ययात्रा

झटपट सोलकढी

Category:

 

प्रथम मिक्सरच्या द्रव पदार्थासाठीच्या भांड्यात १मोठा कप घट्ट दही,१-१/२ते २ कप दूध,१/२ कप कोकण आगळ व पाणी,चवीप्रमाणे साखर व मीठ घालून फिरवून घ्या व एका मोठ्या स्टीलच्या उभ्या आकाराच्या गंजात काढून नंतर त्यात मिक्सरच्या छोट्या भांड्यातून आल्याचा एक छोटा तुकडा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ मिरच्या,धने-जिरे पावडर,थोडी चिरलेली कोथिंबीर व ४-५ कढीपत्याची पाने ह्यांचे वाटण करून घेऊन ते वाटण आणी ५-६ थेंब स्ट्रौबेरी खाण्याचा रंग घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या व काचेच्या ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वरुण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

  April 5, 2014


अवर्गिकृत

स्पंदन भ्रमंती तर्फे २ दिवसीय अलिबाग सफर

Category:

 

ट्रेक्स तसंच अॅडव्हेंचर टुर्स मध्ये अग्रेसर नाव असलेल्या “स्पंदन भ्रमंती” तर्फे दिनांक १९ व २० एप्रिल २०१४ या दिवशी अलिबाग व लगतच्या प्रसिध्द पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी खास टुर आयोजित केली आहे.

  April 4, 2014


व्यक्ती-परिचय

अमोल अनिल मुजुमदार

Category:

 

अमोल मुजुमदार हा मुंबई, आसाम व आंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणार्‍या खेळाडूंपैकी तो एक आहे. प्रथम श्रेणीच्या सामन्यातील अनेक विक्रम अमोलच्या खात्यावर जमा आहेत.

  April 2, 2014


अवर्गिकृत

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)

Category:

 

साहित्य : अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची …..

  April 2, 2014


अवर्गिकृत

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती…..

Category:

 

आपण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाल्याची गोष्ट ऐकली आहेच. वाटसरुंना लुटणारा हा वाल्या कोळी या कलियुगातही अवतरला आहे सरकारच्या आणि टोल वसूली कंत्राटदारांच्या रुपाने. तो आता आधुनिक झालाय. त्याने राज्यभरातल्या सगळ्या हमरस्त्यांवर टोलची दुकाने थाटली आहेत. तो एकटा नाही राहिला. त्याच्या पापात नेते, अधिकारी, वसुली कंत्राटदार ही सगळी मंडळी वाटेकरी आहेत.

  April 2, 2014


अवर्गिकृत

निवडणुका आणि मतदार…

Category:

 

पुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यां चाही गोंधळ उडतो. 

  April 2, 2014