१९ दोन नंबरला कुठे जावे ?
पूर्वी घरात जेवण करावे आणि मलविसर्जनाला घराबाहेर जावे अशी पद्धत होती. आता काळ बदलला. आता घराबाहेर खायचे आणि घरात येऊन मलविसर्जन करायचे ???
करणार तरी काय म्हणा शहरीकरण ही गरज झाल्याने त्याला आता पर्यायच नाही. असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे झाले.
पण जंतुसंसर्गाचा मोठा सोर्स आपण घरातच आणून ठेवल्यावर काय करणार ?
नशीब अजून घरात “त्यासाठी” पाणी वापरले जाते आहे.
आणि
२०. q
बाय द वे कागद वापरण्यापेक्षा पाणी वापरणेच आरोग्याला हितकर आहे. आणि आर्थिकदृष्टया देखील कागद परवडत नसावा. मग अट्टाहास का तेच कळत नाही.
२१. मलविसर्जन करायला जाण्यापूर्वी नंतर हात पाय धुवायला लागणारे पाणी आधीच काढून ठेवायची आपली पद्धत होती. रिकामा तांब्या सुद्धा बालदीत बुडवायचा नाही. तो आधीच भरून ठेवायचा. अगदी आजच्या पुणेरी पाट्याच्या भाषेत सार्वजनिक स्वच्छतागृहात वाक्य लिहायचे झाले तर “आधी आणि नंतर पुरेसे पाणी वापरा आणि हो, जाताना डाव्या हाताने दरवाजा उघडू नका” अशा पाट्या खरंच लिहाव्या लागतील.
आधी पाणी भरून ठेवले नाही आणि नंतर हंड्यात तांब्या बुचकळून काढला, म्हणून अख्खा हंडा ओतून टाकून वर डाव्या हातावर आजोबांनी मारलेली छडी लक्षात राहिली असती तर उजवा हात डावा हात पक्का लक्षात राहिला असता.
असो.
असो म्हटलं की. सगळं क्षम्य असतं ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021