१. चिकन एक ते दीड इंचाचे तुकड्यात कापून स्वछ धुवून, निथळून,दही आणि आले लसूण पेस्ट लावून तासभर मुरवत ठेवा.
२.एक कांदा बारीक चिरा आणि एक कांद्याच्या मोठ्या फोडी करा.
३. टोमॅटोही बारीक चिरून घ्या.
४. कढईत एक चहाचा चमचा तेल घालून कांद्याच्या मोठ्या फोडी भाजून घ्या,त्यातच सुके किंवा ओले खोबरे घालून भाजा.गॅस बंद करून अ.क्र.६ ते १२ पर्यंतच्या वस्तू त्यात दडपून ठेवा.
४. थंड झाल्यावर मुलायम वाटून घ्या.
५. प्रेशर पॅनमध्ये तेल घालून त्यात तमालपत्र फोडणीला घाला.त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता.कांदा पारदर्शक झाला की टोमॅटो घालून परता.अर्धी वाटी पाणी घालून,झाकण लावून एक शिट्टी करून घ्या. गॅस बंद करा.
६. प्रेशरपॅन नळाखाली धरून , सांभाळून झाकण उघडा.
७. पुन्हा गॅसवर ठेवून त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण घालून परतत राहा.
८. मसाला तेल सोडू लागला की,चिकन घालून परता.रंग बदलला की,एक वाटी गरम पाणी घाला.