वसुबारस’ची कहाणी

(व्रतकथा)

आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून
होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके
दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी
म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.



(व्रतकथा)

आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली इकडे ये !

सून आली, “काय म्हणून म्हणाली’ तशी म्हातारी म्हणाली “मी शेतावर जाते.

दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे, मुगाचे दाणे काढ, गव्हाळे, मुगाळे शिजवून ठेव’, असं सांगितलं. आपण निघून शेतावर गेली. सून माडीवर गेली, गव्हाळी-मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली. चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसली. दुपार झाली. तशी सासू घरी आली. सूनेनं पान वाढलं. सासूनं देखलं. ताबंड मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणून सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकिगत सांगितली. सासू घाबरली. न समजता चूक घडली, म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. “देवा, देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा करा ! गाईची वासरे जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन.” असा निश्चय केला.

देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंत:करण देखिले. पुढे संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं. मग देवानं काय केलं? गाईची वासरं जिवंत केली. ती उड्या मारत मारत प्यायला गेली. गाईचे हंबरडे बंद झाले. सुनेला आश्चर्य वाटलं. म्हातारीला आनंद झाला. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाई-गोह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली. आनंदी झाली.

तसे तुम्ही-आम्ही होवू. ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी सुफळ संपूर्ण !

Author