एक “कृष्णचिन्ह ” !

हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास " नरो वा कुंजरो वा " म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते असा सकलकला शिरोमणी आणि म्हणूनच आजही आपल्याला आपल्या घरातला वाटणारा हा भगवान श्रीकृष्ण !

चित्रकार,गीतकार,साहित्यिक,तत्वचिंतक,योगीपुरुष अशा अनेकांना हजारो वर्षे या श्रीकृष्णाने नवनिर्मितीसाठी उद्युक्त केले आहे.

सोबतच्या कृष्णचिन्हामध्ये दोन हातात धरलेली मुरली आणि त्याखाली ७ वेगवेगळ्या लांबीच्या साखळ्यांना ७ वेगवेगळ्या आकाराचे घुंगुर आहेत. अधिक लांबीच्या साखळीचा जाड घुंगुर खर्ज किंवा खालच्या "सा" साठी तर एकेक स्वर चढत थेट कृष्णापर्यंत पोचता येते. पण त्याआधी मुरलीच्या ६ छिद्रांतून षडरिपु बाहेर जायला हवेत.

माझ्या कल्पनेतून साकारलेले हे :कृष्णचिन्ह" पूर्णपणे पितळी आहे. येत्या कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वांना सादर ....

--मकरंद करंदीकर



हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते असा सकलकला शिरोमणी आणि म्हणूनच आजही आपल्याला आपल्या घरातला वाटणारा हा भगवान श्रीकृष्ण !

चित्रकार,गीतकार,साहित्यिक,तत्वचिंतक,योगीपुरुष अशा अनेकांना हजारो वर्षे या श्रीकृष्णाने नवनिर्मितीसाठी उद्युक्त केले आहे.

सोबतच्या कृष्णचिन्हामध्ये दोन हातात धरलेली मुरली आणि त्याखाली ७ वेगवेगळ्या लांबीच्या साखळ्यांना ७ वेगवेगळ्या आकाराचे घुंगुर आहेत. अधिक लांबीच्या साखळीचा जाड घुंगुर खर्ज किंवा खालच्या “सा” साठी तर एकेक स्वर चढत थेट कृष्णापर्यंत पोचता येते. पण त्याआधी मुरलीच्या ६ छिद्रांतून षडरिपु बाहेर जायला हवेत.

माझ्या कल्पनेतून साकारलेले हे :कृष्णचिन्ह” पूर्णपणे पितळी आहे. येत्या कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वांना सादर ….

–मकरंद करंदीकर

Author