प्रमाणित अक्षरचिन्हं आणि लिपी

मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन....

पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला

पारंपारिक स्वरमाला :

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार...अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार.... अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत.

पारंपारिक व्यंजनमाला :

कंठ्य (Guttural) :: क ख ग घ ङ
तालव्य (Palatal) :: च छ ज झ ञ
मूर्धन्य (Retroflex) :: ट ठ ड ढ ण
दंत्य (Dental) :: त थ द ध न
ओष्ठ्य (Labial) :: प फ ब भ म
य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ

असे अेकूण 35 व्यंजनं आणि 16 स्वर म्हणजे 51 वर्ण आणि ॐ हे अक्षर घेतले तर 52 वर्ण होतात.

य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ या व्यंजनांचंही वर्गीकरण केलं आहे. ह (कंठ्य), य आणि श (तालव्य. खरं म्हणजे य आणि श हे अुच्चार थोडे भिन्न आहेत.), र आणि ष (मूर्धन्य), ल आणि स (दंत्य), व (ओष्ठ्य).

ळ, क्ष आणि ज्ञ हे वर्ण आगळेवेगळेच आहेत. संस्कृतात ळ नाही. भगवदगीतेच्या 18 अध्यायांच्या 700 श्लोकात ळ अेकदाही आला नाही. क्ष हा वर्ण क् श् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे तर ज्ञ हा वर्ण ...द् न् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे. लंगडा श् आणि र हे जोडाक्षर लिहीणं जरा कठीणंच होतं म्हणून श्र हा वर्ण घडविणार्‍या व्यक्तीच्या प्रतिभेला माझे शतश: प्रणाम. श्र हा वर्णदेखील क्ष आणि ज्ञ सारखा स्वतंत्र समजायला हवा.

अ आ इ ई उ ऊ ऋ ए अॅ ऐ ओ ऑ औ ही स्वरमाला, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, 6 नोव्हेंबर 2009 रोजी काढलेल्या अध्यादेशानं प्रमाण झाली. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे, सुमारे 200 वर्षानंतर, अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले गेले. 200 वर्षानंतरच हे स्वर शुध्द झाले, तोपर्यंत ते अशुध्द समजले गेले.

आज आपल्या समाजाची अशी अवस्था झाली आहे की, सरकारी कायदा, अध्यादेश...फतवा काढल्याशिवाय, आपण अु्क्रांत बदल स्विकारीत नाही. काही प्रस्ताव, सरकार दरबारी वर्षानुवर्षे कायदा होण्याच्या प्रतिक्षेत खितपत पडलेले असतात. परंतू काही विलक्षण घटना घडली की अेका दिवसातच, त्या प्रस्तावाचं कायद्यात रुपांतर होतं. बव्हंशी हे कायदे कागदावरच राहतात. जनताजनार्दन जेव्हा हे बदल अुस्फुर्तपणे स्वीकारतो तेव्हाच तो खराखुरा बदल असतो.

ज्ञानेश्वर माअुलींनी, सुमारे 700 वर्षापूर्वी ‘भावार्थ दीपिका’ हा, भगवदगीतेवरील निरूपणाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथालाच, आज आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. त्यांची मराठी ही त्या काळाची अती शुध्द प्रासादिक मराठी समजतो. त्या मराठीबद्दल आपल्याला आदरही आहे. भाषेची अुत्क्रांती हे वास्तव आहे. त्यानुसार ज्ञानेश्वरी मराठी आता कालबाह्य झाली आहे. हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवं. हा बदल नैसर्गिकरित्या हळूहळू अुस्फुर्तपणे झालेला आहे. मराठी भाषेची अुत्क्रांती आजही होते आहे.

थोडक्यात म्हणजे अ ची पुढीलप्रमाणे बाराखडी ::: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ आणि मागील लेखात सुचविलेली व्यंजनमाला, जनताजनार्दनानं स्वीकारण्यासाठी सरकारी फतव्याची गरज नसावी.

-- गजानन वामनाचार्य
बुधवार, २६ नोव्हेंबर २०१४

मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन….

पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला

पारंपारिक स्वरमाला :

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत.

पारंपारिक व्यंजनमाला :

कंठ्य (Guttural) :: क ख ग घ ङ
तालव्य (Palatal) :: च छ ज झ ञ
मूर्धन्य (Retroflex) :: ट ठ ड ढ ण
दंत्य (Dental) :: त थ द ध न
ओष्ठ्य (Labial) :: प फ ब भ म
य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ

असे अेकूण 35 व्यंजनं आणि 16 स्वर म्हणजे 51 वर्ण आणि ॐ हे अक्षर घेतले तर 52 वर्ण होतात.

य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ या व्यंजनांचंही वर्गीकरण केलं आहे. ह (कंठ्य), य आणि श (तालव्य. खरं म्हणजे य आणि श हे अुच्चार थोडे भिन्न आहेत.), र आणि ष (मूर्धन्य), ल आणि स (दंत्य), व (ओष्ठ्य).

ळ, क्ष आणि ज्ञ हे वर्ण आगळेवेगळेच आहेत. संस्कृतात ळ नाही. भगवदगीतेच्या 18 अध्यायांच्या 700 श्लोकात ळ अेकदाही आला नाही. क्ष हा वर्ण क् श् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे तर ज्ञ हा वर्ण …द् न् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे. लंगडा श् आणि र हे जोडाक्षर लिहीणं जरा कठीणंच होतं म्हणून श्र हा वर्ण घडविणार्‍या व्यक्तीच्या प्रतिभेला माझे शतश: प्रणाम. श्र हा वर्णदेखील क्ष आणि ज्ञ सारखा स्वतंत्र समजायला हवा.

अ आ इ ई उ ऊ ऋ ए अॅ ऐ ओ ऑ औ ही स्वरमाला, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, 6 नोव्हेंबर 2009 रोजी काढलेल्या अध्यादेशानं प्रमाण झाली. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे, सुमारे 200 वर्षानंतर, अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले गेले. 200 वर्षानंतरच हे स्वर शुध्द झाले, तोपर्यंत ते अशुध्द समजले गेले.

आज आपल्या समाजाची अशी अवस्था झाली आहे की, सरकारी कायदा, अध्यादेश…फतवा काढल्याशिवाय, आपण अु्क्रांत बदल स्विकारीत नाही. काही प्रस्ताव, सरकार दरबारी वर्षानुवर्षे कायदा होण्याच्या प्रतिक्षेत खितपत पडलेले असतात. परंतू काही विलक्षण घटना घडली की अेका दिवसातच, त्या प्रस्तावाचं कायद्यात रुपांतर होतं. बव्हंशी हे कायदे कागदावरच राहतात. जनताजनार्दन जेव्हा हे बदल अुस्फुर्तपणे स्वीकारतो तेव्हाच तो खराखुरा बदल असतो.

ज्ञानेश्वर माअुलींनी, सुमारे 700 वर्षापूर्वी ‘भावार्थ दीपिका’ हा, भगवदगीतेवरील निरूपणाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथालाच, आज आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. त्यांची मराठी ही त्या काळाची अती शुध्द प्रासादिक मराठी समजतो. त्या मराठीबद्दल आपल्याला आदरही आहे. भाषेची अुत्क्रांती हे वास्तव आहे. त्यानुसार ज्ञानेश्वरी मराठी आता कालबाह्य झाली आहे. हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवं. हा बदल नैसर्गिकरित्या हळूहळू अुस्फुर्तपणे झालेला आहे. मराठी भाषेची अुत्क्रांती आजही होते आहे.

थोडक्यात म्हणजे अ ची पुढीलप्रमाणे बाराखडी ::: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ आणि मागील लेखात सुचविलेली व्यंजनमाला, जनताजनार्दनानं स्वीकारण्यासाठी सरकारी फतव्याची गरज नसावी.

— गजानन वामनाचार्य
बुधवार, २६ नोव्हेंबर २०१४

Author