थांब विज्ञाना, नको लावूस शोध

बागेतील तारका- थांबव, विज्ञाना तुझे शोध



६९ थांबव, विज्ञाना तुझे शोध

थांब विज्ञाना, नको लावूस शोध
नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ /

उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी
दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १
थांब विज्ञाना, नको लावूस शोध

फुलांतील सुवास फळांतील मधुर रस
पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २
थांब विज्ञाना, नको लावूस शोध

नदीतील संथता ओढ्यातील चपळता
धबधब्यातील प्रचंडता रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध ३
थांब विज्ञाना, नको लावूस शोध

शरिराची योजना गुंतागुंतीची रचना
श्रेष्ठत्व दिले ज्ञाना भावना व विचार यांचा, निर्माण केला वाद ४

थांब विज्ञाना, नको लावूस शोध

तुझ्या शोधांतील झेप क्षणिक सुखाची झोप
परि करी निसर्गा ताप नको करुं तूं, ईश्वरी दयेचा प्रवाह बंद ५
थांब विज्ञाना, नको लावूस शोध

विवीध-अंगी *** ३८
रोक सका है कौन उसे जिसने बस चलनाही सीखा /
मिटा सका है कौन उसे जिसने बस जीनाही सीखा /
बुझा सका है कौन उसे जिसने बस जलनाही सीखा /
वीष अमृत बना उसे जिसने बस पीनाही सीखा /

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Author