पंडित मालवीय

संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही.



संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही. अल्पकाळातच त्यांनी काँग्रेसमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला. कांग्रेसमधील सहभागाबरोबरच कालांतराने ते स्वातंत्र्य लढ्यातही अग्रणी नेते बनले. देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी तन, मन, धन अर्पण केले. जीवाची पर्वा न करता अनेक आंदोलनांमधून ते सक्रिय होते. त्याबद्दल त्यांना अनेकवेळा कारावास भोगावा लागला.

स्वतःच्या जीवनात धर्माचे आचरण करीत असताना ज्या जुन्या अमानवी रुढी, परंपरा आहेत, याविरुद्ध ते बंड करून उठले. हरिजनांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून उत्तेरतील अनेक मंदिरात आंदोलने केलीच, शिवाय नाशिकच्या काळाराम मंदिरातही सत्याग्रह केला. समाजातील तथाकथीत विद्वानांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पण, ते डगमगले नाहीत. ‘मला जो धर्म कळायला तो हाच आहे,’ असे त्यांनी ठासून सांगितले. १९०७ रोजी सुरतला कसचे अधिवेशन झाले. त्यावेळी डॉ. गोपाळकृष्ण गोखले यांच्या मवाळ (नेमस्त) गट आणि लोकमान्य टिळकांचा जहाल गट यांचा प्रचंड संघर्ष झाला. त्यावेळी मंडपामध्ये मदनमोहन मालवीय रडत बसले होते. त्यानंतर एकूण चारवेळा ते अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष झाले. गांधींची त्यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान होते. तरीही त्यांच्याप्रतीची निष्ठा अपार होती. त्यांनी गांधींजींच्या असहकार चळवळीला जाहीरपणे विरोध दर्शविला होता. हिंसाचार झाल्यानंतर गांधींजींनी चळवळ थांबवायला सांगितले. विरोध असतानाही गांधींनी केलेल्या चळवळीचा राग मनात न धरता गांधींच्या विनंतीवरुन त्यांनी चळवळीत खटले दाखल केलेल्या १३० आंदोलकांचे वकीलपत्र घेतले आणि त्यांची निर्दोष मुक्तता केली.

संकलन : शेखर आगासकर

Author