लेखसंग्रह

सरसकट ची झाली कटकट..

Category:

 

आदर्श परिस्थितीत प्रत्येक शैक्षणिक धोरण चांगलेच असते, त्याचा निकाल लावणे हे राबविणारऱ्यांच्या हातात असते. आता सरसकट पास करण्याचे धोरण बंद होणार. केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा साठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखसंग्रह

जातिभेदाला पहिली थप्पड

Category:

 

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची.

लेखसंग्रह

दिवाळीचे बदलते संदर्भ

Category:

 

दिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

लेखसंग्रह

धम्मगिरी विपश्यना ध्यान केंद्र इगतपुरी

Category:

 

धम्मगिरी, इगतपुरी (महाराष्ट्र) येथे स्थित एक प्रसिध्द विपश्यना केंद्र आहे. हे केंद्र खास विपश्यना ध्यान साधनेसाठी ओळखले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. धम्मगिरीचे संस्थापक श्री सत्यनारायण गोयनका (गोयंका गुरुजी) होते, ज्यांनी विपश्यना साधनेसाठी हे केंद्र उभारले.

लेखसंग्रह

प्रश्न – मोठ्यांचे आणि छोट्यांचे..

Category:

 

खरं म्हणजे मोठ्यांना असे लहान मुलांसारखे प्रश्नच पडत नाहीत. त्यांना प्रत्येकाला वाटतं असते आपलेच प्रश्न सगळ्यात मोठे असतात तेच आपल्याला सोडवता येत नाहीत. त्यांना त्यांच्या सोयीनुसार प्रश्न पडतात आणि जेव्हा गरज असेल अडलेले असेल तेव्हाच विचारतात. मोठे झाल्यावर निरागसपणा जाऊन इगो आलेला असतो.

लेखसंग्रह

स्वच्छता

Category:

 

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.

लेखसंग्रह

सकारात्मकता : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

Category:

 

सकारात्मक राहू या, असे म्हणले की सगळेच, हो हो चला सकारात्मक राहू या, असे म्हणतात. पण सकारात्मक राहायचे म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हो हो करत पळ काढायचा आणि म्हणायचे मी सकारात्मक विचार केला हो, असे नसते ना.