मतिपोसक जातक
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितअनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.