लेखसंग्रह

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज

Category:

 

“पर्यावरणाचा र्‍हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्‍हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
पर्यावरण र्‍हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो .

लेखसंग्रह

मुंबई ते ठाणे रेल्वे – १७१ वर्षे…

Category:

 

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले.

लेखसंग्रह

बडोद्यातील ‘मुद्रण’ क्रांती

Category:

 

भारतातील लेखक-प्रकाशकांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ व आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात मोठे प्रकाशक ठरलेल्या सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात मुद्रण कलेच्या माध्यमातून केलेली ‘ज्ञानक्रांती’ आजच्या ‘ऑनलाईन’ जमान्यात समजून घेणे मार्गदर्शक ठरेल.

लेखसंग्रह

द्रौपदीची साडी

Category:

 

महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे

लेखसंग्रह

सौभाग्यलेणं – हळदीकुंकू

Category:

 

सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व “हळदी कुंकू” यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

लेखसंग्रह

बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पाच वर्ष

Category:

 

२६ फेब्रुवारी २०१९ पहाटेचे ३.३० वाजले होते. स्थळ होतं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. सर्व शांत झोपेत होते, एकानंतर एक स्फोटाने हडकंप माजला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने बदला घेण्यासाठी ऑपरेशन बंदर अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक २ केलं. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

लेखसंग्रह

सौभाग्यलेणं – मंगळसूत्र

Category:

 

सौभाग्य अलंकारातील सुवासिनी स्त्रियांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दागिना म्हणजे “मंगळसूत्र”.

लेखसंग्रह

मनातलं मनापासून – “३८ कृष्ण व्हिला”

Category:

 

काही काही नाटकं ही नाटकाचं नाव बघून, निर्मिती संस्था ,दिग्दर्शक कलाकार बघून लगेच बघावी अशी वाटतात….. असच एक नाटक म्हणजे “३८ कृष्ण व्हिला”. नाटकाचं नाव बघूनच वाटत की, हे एक मर्डर मिस्टरी ,किंवा गूढ अनामिक रहस्यमय असं असावं,पण आपल्याला पहिला धक्का तिथेच बसतो….हे नाटकात रहस्य आहे, धक्का आहे, काय घडत असेल या व्हीला मधे याची सतत उत्कंठा निर्माण करणार आहे..

लेखसंग्रह

सौभाग्यलेणं – जोडवी

Category:

 

जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.

लेखसंग्रह

आडनावांच्या गमती जमती

Category:

 

 एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना!