कथा

धौम्य व उपमन्यू

Category:

 

फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत. कामे करीत असताना त्यांना आपोआपच व्यवहारज्ञानही प्राप्त होई; आणि त्यांची शरीरे सुदृढ बनत. धौम्य ऋषींच्या आश्रमातील सर्व शिष्यांत उपमन्यू, वेद आणि आरुणी हे तीन अत्यंत बुद्धिमान आणि आज्ञाधारक शिष्य गुरुजींचे फार आवडते होते.

कथा

सर्वात वाईट वस्तू

Category:

 

एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले.

कथा

इमाम आणि देवदूत

Category:

 

शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.

परिचय – परिक्षण

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित पैलूंचं दर्शन – रिंगणाबाहेरून

Category:

 

पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला

लेखसंग्रह

शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व

Category:

 

शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे.