भारतमातेच्या वीरांगना – ५७ – मीरा बहन
Category:
साहित्य - ललित७ नोव्हेम्बर १९२५ साली त्या भारतात आल्या, त्यांना घ्यायला सरदार वल्लभाई पटेल, महादेव देसाई आणि स्वामी आनंद गेले होते. इथे आल्यावर त्या हिंदी भाषा शिकल्या, भगवद्गीता शिकल्या, आणि गांधीजींच्या आश्रमाची पूर्ण कार्यपद्धती स्वीकारली, मैडलीन च्या मीरा बहन झाल्या, स्वाभाविकच आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचासुद्धा त्या हिस्सा बनल्या. तत्पूर्वी १९३१ साली लंडन ला झालेल्या गोलमेज परिषदेच्या त्या हिस्सा बनल्या. १९३१ साली असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणामी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी भारताची बाजू इतर देशांसमोर मांडायला सुरवात केली.