सेवाव्रती
Category:
साहित्य - ललितकर्माशी निष्ठा ठेऊन निर्मोही आचरण करत निवृत्त होणाऱ्या असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांचे परब जमादार हे एक प्रातिनिधिक उदाहरण. खिसा कसा कापला आहे हे पाहून कोणत्या ‘लाईन’ वरचा आरोपी आहे हे ओळखणारे , कडी कशी तोडली आहे हे पाहून आणि चोराने काय नेलं या पेक्षा काय सोडून गेला हे पाहून आरोपींचा नेमका अंदाज बांधणारे आणि काही तासात केस उघडकीला आणणारे unsung heroes या DCB CID ने पाहिले आहेत.