एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)
Category:
साहित्य - ललितमला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले. तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या. त्यांनी नोकऱ्या केल्या. सगळे मुलगे नाही शिकले. मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या. आणखी काय हवं ? दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला. आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले.