साहित्य - ललित

होके मजबूर मुझे

Category:

 

१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

साहित्य - ललित

होके मजबूर मुझे

Category:

 

१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

व्यक्ती-परिचय

नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

Category:

 

अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली.

साहित्य - ललित

निपटारा – भाग  3

Category:

 

दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना.

मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, तू आर्ट स्कूलमधे कॅलीग्राफी शिकतेस. तू एक काम करायचं. अरूच्या हस्ताक्षरासारखे हस्ताक्षर काढून एक चार ओळीचं पत्र तयार करायचं. त्यासाठी जाडा भरडा ड्रॉइंग पेपर वापर.

व्यक्ती-परिचय

नीलम प्रभू अर्थात करुणा देव

Category:

 

नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.

व्यक्ती-परिचय

नीलकंठ खाडिलकर

Category:

 

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

निरंजन घाटे

Category:

 

प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत.

व्यक्ती-परिचय

निरंजन उजगरे

Category:

 

निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी

Category:

 

राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली.