स्टीवर्ड
Category:
अवर्गिकृतरात्री तापा साठी गोळ्या घेऊन झोपायला गेलेला स्टीवर्ड सकाळी कामावर आला नाही म्हणून कूक ने चीफ मेट शी बोलून एक ट्रेनी सी मन मदत करण्यासाठी मागून घेतला. चीफ मेट ने कॅप्टन च्या कानावर ही गोष्ट घातली. कॅप्टन ने स्टीवर्ड ला केबिन मध्ये फोन करून तब्येतीची विचारणा केली असता त्याने डोकं दुखतंय आणि मळमळते आहे असे सांगितले तसेच अंगावर लालसर पुरळ उठत असल्याचे सांगितले. कॅप्टन ने सेकंड मेट ला विचारून कोण कोणत्या गोळ्या दिल्या याबद्दल खात्री करून घेतली.