गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी व कशाप्रकारे घ्यावी?
Category:
अवर्गिकृतहकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात.