साहित्य - ललित

मेहदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही’ या सुप्रसिद्ध गझलबद्दल

Category:

 

कांहीं काळापूर्वीच, १३ जून २०१२ ला, मेहदी हसन यांचे निधन झाले. त्यांना ‘शहनशाह-ए-गझल’ म्हणतात ते यथार्थ आहे. त्यांचा नुसता उल्लेख झाला की, त्यांनी गायलेल्या अनेक उत्तमोत्तम गझला आठवतात. ‘गुलों में रंग भरे बादे नौबहार चले । चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।

साहित्य - ललित

ढाई अच्छर प्रेम का.. (प्रास्ताविक : ‘प्रीतिगंध’ काव्यसंग्रहाचें)

Category:

 

शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची प्रस्तावना लिहिणें वेगळें. पण, श्री. म्हाडेश्वर यांनी गळ घातली.

लेखसंग्रह

आडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव

Category:

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते.

लेखसंग्रह

आडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर

Category:

 

पेंढारे’ या गावाला ‘कर’ जोडून हे आडनांव तयार झालं असावं असा प्रथम दर्शनी समज होतो. ‘पेण्ढरकर’ या आडनावावरून राजकवी यशवंत यांचे पूर्वज ‘पेण्ढर’ या मूळ गावाचे रहिवासी असावेत असाही रास्त समज होतो.

लेखसंग्रह

गाढवेंचे झाले तारळेकर

Category:

 

कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.