लेखसंग्रह

बचतीचे थोतांड!

Category:

 

सरकारला बचत करायची असेल किंवा वायफळ खर्चाला आवर घालायचा असेल तर केवळ आपल्या मंत्र्यांचा ‘क्लास’ बदलून चालणार नाही. सरकारने आता एवढ्यावरच थांबू नये. सरकारी तिजोरीतून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा नेमक्या कारणासाठी योग्य विनियोग होतो की नाही याची दक्षता घेतली जावी, प्रसंगी त्यासाठी
कठोर पावले उचलावी लागली तरी हरकत नाही.

  September 20, 2009


लेखसंग्रह

स्वतःला बदलायच आहे? टी. क्यू. एम. वापरा!!!

Category:

 

स्वतःला कशाला बदलायच? आपण तर ‘बेस्ट’ असतो!!! बाकीचे गाढव असतात. हे अगदी खरं आहे. हा देश , हा समाज, हे नातेवाइक, शेजारी ; खरं सगळच बदलायला हवं आहे. कोण बदलणार? हे काम मोठया लोकांचे. म्हणुन आपल्यालाच बदलायला हवं. आणि तेही आपणच!!

  September 18, 2009


लेखसंग्रह

बेजबाबदारपणाचा कळस!

Category:

 

एक नागरिक म्हणून सरकारने पुरविलेल्या सगळ्या सुविधांचा उपभोग तुम्ही घेत असाल तर या देशाने स्वीकारलेल्या न्यायव्यवस्थेचा, शासनव्यवस्थेचा आदर करणे तुमची जबाबदारी ठरते. एक आदर्श नागरिक म्हणून आपण आपल्या हक्कांबाबत जितके जागृत असायला हवे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिक जागृत आपल्या कर्तव्यांबाबतही असणे गरजेचे आहे. आपले हित साधताना इतरांच्या हिताला बाधा पोहचत तर नाही ना, आपल्यासाठी ज्यांचा काहीही दोष नाही असे इतर अनेक लोक विनाकारण फरफटले तर जात नाहीत ना, याची खातरजमा आपणच करायला हवी.

  September 13, 2009


व्यक्ती-परिचय

आठवणीतील गदिमा….पु.ल.देशपांडे

Category:

 

पुण्याला ‘बालगंधर्व’ थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, “स्वामी, चार ओळी हव्या आहेत ….बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी”.मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,”असा बालगंधर्व आता न होणे.”

  September 12, 2009


साहित्य - ललित

पुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा!

Category:

 

गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.

  September 12, 2009


लेखसंग्रह

गणराया बुध्दी दे!

Category:

 

गणेशोत्सव हा इतर अनेक पतवैकल्यासारखाच आपल्या घरात साजरा करण्याचा उत्सव होता. टिळकांनी तत्कालीन गरज लक्षात घेऊन शुद्ध राजकीय हेतूने या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या पृष्ठभूमीवर आज स्वातंत्र्योत्तर काळात उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप टिकविणे गरजेचे आहे का आणि असलेच तर त्यामागे कोणते हेतू आहेत, त्या हेतूंची पूर्तता होते की नाही, या सगळ्यांची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे.

  September 6, 2009


लेखसंग्रह

संगणकातल्या पसार्‍याची आवराआवर

Category:

 

हे नवीनच शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं? खरं आहे. संगणकावर काही पसारा असू शकतो याचं भानच आपल्याला बऱयाचदा नसतं. एकदा का संगणक घरी आला की त्याच्यावर पाहिजे तेवढी माहिती ठेवायची आपल्याला घाई होते. कधीतरी-कुठेतरी, कोणाकडून ऐकलेले शेकडो प्रोग्रॅम्स – बहुधा ज्याच्याकडून संगणक घेतलाय त्याच्याकडूनच – आपल्या संगणकावर घालून घेतले जातात. यात आपल्या गरजेचे किती आणि अनावश्यक किती याचा आपण विचारच करत नाही.

  September 1, 2009


लेखसंग्रह

भाजपला झाले तरी काय?

Category:

 

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही.

  August 30, 2009


व्यक्ती-परिचय

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा)

Category:

 

अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

  August 25, 2009