संतापातला शांतपणा
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितरोजचे वर्तमानपत्र उघडले रे उघडले, की बलात्कार, दरोडे, खून, लफडी, घोटाळे, अब्जावधी-कोट्यवधी बेनामी मालमत्तेचा पोलिसांनी लावलेला शोध, खोट्या चलनी नोटांचे कारखाने या अशा बातम्या वस्सकन अंगावर येतात. संघटित गुन्हेगारी, पोलीस खात्याची बदनामी हे विषय तर वर्तमानपत्रात रतीब घालणारे विषय झाले आहेत. रोज सकाळी वृत्तपत्र वाचून मन विषण्ण होते, सुन्न होते. काही इंग्रजी वृत्तपत्रांत, विशेषत या दैनिकांच्या रविवार पुरवण्यात स्वैर सेक्स, पोर्नोग्राफी यांना प्रतिष्ठा देणारे लेख वाचायला मिळतात.
Category:
साहित्य - ललितमनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची समजूत घालावी, की `सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगी?’ असे म्हणत स्मृतींना उजाळा द्यावा? जन्नतमध्ये नौशादसाहेबांची मैफील शकील बदायुनी, शैलेंद्र, मदन मोहन, रफी यांच्यासोबत रंगेल का? अनेक वेड्या प्रश्नांनी भंडावून सोडणारे मन! बहिणाबाईंनी म्हटलेच आहे, `मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला परी येत पिकावर!’ माणसाचे आयुष्य फारतर पाचपन्नास वर्षांचे.
Copyright © 2025 | Marathisrushti