कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गॅगरीन !

Category:

 

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वरुणराजाने अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. या विक्रमी पावसाने मुंबई आणि कोकणाची पार वाताहत केली. विदर्भातील काही भागालाही मोठा फटका बसला.

लेखसंग्रह

कुरतडलेला नकाशा हिंदुस्थानचा

Category:

 

०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही.

लेखसंग्रह

मायेचा पाश!

Category:

 

आपल्या देशाच्या लोकसंख्येने शंभर कोटीचा आकडा केव्हाच पार केला आहे. ही वाढती लोकसंख्या सरकारला संकट वाटत आहे. एका दृष्टीने पाहिले तर ते संकटच आहे.

लेखसंग्रह

कुपोषण : मुळापर्यंत पोहचण्याची गरज !

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 03/04/2005

डॉ. अभय बंग यांच्या नेतृत्वाखाली ‘बालमृत्यू मूल्यमापन समिती’ने आपला दुसरा आणि अंतिम अहवाल शासनाला नुकताच सादर केला. या अहवालात राज्यातील बालमृत्यूंना आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे.

लेखसंग्रह

मराठी टक्का घसरतोय!

Category:

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांनी परवा एका पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्रात मराठी टक्का घसरतोय अशी खंत बोलून दाखविली. पूर्वी केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीच नावे अमराठी होती, आता तर चक्क मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यादेखील अमराठी आडनावाने सजू लागल्या आहेत, असे काहीसे ते बोलले.

लेखसंग्रह

नवा वर्णवाद!

Category:

 

अश्मयुगात रानोमाळ भटकणारा, शिकार करून कच्चे मांस खाऊन जगणारा माणूस शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यावर स्थिर झाला. आधी त्याचे हे संघटन टोळ्यांच्या स्वरूपात होते. पुढे या संघटनेला अधिक रेखीव स्वरूप प्राप्त झाले आणि समाजाची निर्मिती झाली.

लेखसंग्रह

आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 13/02/2005
‘आंबेडकरी’ हे विशेषण धारण करणारा जो साहित्य प्रकार मराठी भाषेत रुजू झाला त्याची आता अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे. साधारण 60 च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतविलेल्या स्फुल्लिंगाच्या ठिणग्या साहित्यरुपाने उडू लागल्या आणि अख्खं मराठी साहित्य विश्व या ठिणग्यांच्या दाहकतेने हादरुन गेले.

लेखसंग्रह

राखेतून सोन्याचा धूर!

Category:

 

तार्किकदृष्ट्या या आगींमागील कारणांचा वेध घेतल्यास अशा घटनांमागे मोठे अर्थकारण असल्याचे सहज स्पष्ट होते. कापूस खरेदी आटोपलेली असते, कापसाच्या गठाणी बांधून तयार झालेल्या असतात. बाकी असते ती केवळ प्रतवारी आणि मूल्यांकन.

लेखसंग्रह

नाक दाबावेच लागेल.

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 06/03/2005
बिहार, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर सुरू असलेला लोकशाहीचा तमाशा बघता निवडणूक पद्धतीत आमूलाठा सुधारणा करणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. या दोन्ही राज्यात आणि याआधी केंद्रात तसेच इतर राज्यातदेखील खंडित जनादेशामुळे जी काही राजकीय साठमारी झाली अथवा होत आहे ती नक्कीच लोकशाहीचा गौरव वाढविणारी नाही. केवळ सत्तेसाठी आपल्या विचारधारा, श्रद्धा वेशीला टांगून राजकीय पक्षांमध्ये अक्षरश: अनैतिक सौदेबाजी होत असते.

लेखसंग्रह

शेतकरी आणि प्रतिष्ठित

Category:

 

आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कृषिक्षेत्राच्या, कृषकांच्या समस्या, त्यांच्या निराकरणाचे मार्ग या विषयावर चर्चेला पेव फुटले आहे. भारताचा शेतकरी प्रचंड हलाखीत जगतो आहे, शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे, यावर झाडून साऱ्यांचे एकमत असते; परंतु शेतकरी दरिद्री का आहेत, यावर फारशा गांभीर्याने कोणी चिंतन करताना दिसत नाही. गॅट करारामुळे जागतिक व्यापार खुला झाला.