इकोफ्रेंडली होळी रंगपंचमी

आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.



|| हरि ॐ ||

होळी पुढे मारल्या जात होत्या बोंबा

आणि होते हिडीस नृत्य आणि हावभाव,

वर्षभराचा हिशेब चुकताकरण्या

आता नाही घेणार कुणाचा ठाव !

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा

नाही तो आपणा फुकट घालवायचा

खेळू आम्हीं होळी विना पाण्याची

असे ती पर्यावरण रक्षणाची !

नाही करणार उधळण विषारी रंगांची,

बुज राखू वायू प्रदूषणाची

नाही पसरवू देणार हवेत विषारी रंग

ज्याने होईल रंगांचा बेरंग !

समजावून सांगू पाण्याचे महत्व आणि

विषारी रंगांचे दुष्परिणाम धुळवड खेळणार्‍यांना

नाही करणार बिल्डिंग रंगाने खराब

रंगपंचमी साजरी करताना !

साजरी करू इकोफ्रेंडली होळी आणि रंगपंचमी

एक नवीन पायंडा पाडून..!!

— जगदीश पटवर्धन

Author