निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.
माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.
हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.
त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.
हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
कसा कळणार ?
मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
आपुला संवाद आपणासी.....
अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.
पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
त्याला विसरून कसे चालेल ?
निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.
माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.
हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.
त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.
हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
कसा कळणार ?
मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
आपुला संवाद आपणासी…..
अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.
पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती – समाधान.