लेखसंग्रह

रणजी आणि पहिले एकदिवसीय द्विशतक

Category:

 

राजेशाही थाटाची, पौर्वात्य किमयेची आणि उच्छृंखल अशी फलंदाजी रणजी करीत. लवचिक मनगट अनेकांजवळ असते, वेळही बरेच जण अचूक साधतात पण या दोन्ही गोष्टींसोबत उपजत नजाकत ज्या फार विरळा किमयागारांजवळ असते त्यात रणजींचा समावेश होतो. १९९७ च्या विश्वचषकातील एका सामन्यात बांद्र्याच्या मिडल इन्कम ग्रुप ग्राऊंडवर बेलिंडाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिले द्विशतक झळकावले. तोपर्यंतच काय, त्याच्यानंतरही सुमारे १३ वर्षे ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमली नाही.

लेखसंग्रह

लालाजी

Category:

 

ब्रिटिश वर्चस्वाखालील हिंदुस्थानातील एका ‘काळ्या’ खेळाडूने सभ्य गृहस्थांच्या खेळात त्यांच्याचविरुद्ध शतक काढावे ही ताज्जुब की बात होती. खेळ संपल्यानंतर लालाजींभोवती प्रेक्षकांचा गराडा पडला. त्यांच्या गळ्यात पुष्पहार मावेनासे झाले. अनेक महिलांनी आपल्या अंगावरील दागदागिने काढून लालाजींना भेट म्हणून दिले. राजे-महाराजांनीही लालाजींना बक्षिसी दिली. भारतातर्फे पहिल्यांदाच शतक काढणारे लालाजी हे खरोखरीचे हिरो ठरले. भारतीय राष्ट्रवाद जिवंत झाल्याचा हा ढळढळीत पुरावा होता. लालाजींना पुन्हा मात्र कसोट्यांमध्ये कधीही शतक काढता आले नाही

लेखसंग्रह

यष्टीवेधी बर्टी आणि सच्चूचे पहिले शतक

Category:

 

कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्‍या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते.

लेखसंग्रह

वॉर्नचा गुरू आणि छोट्याचे कसोटी शतक

Category:

 

अश्रफउलच्या दोन जन्मतारखा सांगितल्या जातात पण कोणत्याही तारखेने तो मुश्ताक मोहम्मदच्या १७ वर्षे ८२ दिवस या वयापेक्षा सरसच ठरतो. १९६०-६१ च्या हंगामात पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मदने भारताविरुद्ध शतक केले होते. सुमारे ४० वर्षे मुश्ताकचा विक्रम टिकला.

लेखसंग्रह

किरण मोरे आणि झुलू धमाका

Category:

 

या मालिकेत त्याने 16 झेल लपकले आणि फलंदाजांच्या सरासरीमध्ये त्याच्याहून सरस फक्त एकच जण होता ! नियमित (मान्यताप्राप्त) फलंदाज अपयशी झाल्यानंतर हमखास ‘चालणारा’ फलंदाज म्हणून किरणची क्षमता या पहिल्या मालिकेतच दिसून आली. त्यानंतर सुमारे सात वर्षे तो भारताचा नियमित यष्टीरक्षक राहिला.

लेखसंग्रह

मुष्टिवीर जॉन डग्लस आणि सर्वात ‘लांब’ प्रथमश्रेणी सामना

Category:

 

…आपला नेहमीचा गोलंदाज सिडनी बार्न्सला सोडून जॉनीने त्या कसोटीत गोलंदाजीची सुरुवात केली होती. सिडही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. कप्तानाला भर मैदानावर तो कचाकचा बोलला आणि गोलंदाजी करण्यासाठी जॉनीने पुन्हा चेंडू हातात घेतला नाही. सिडच्या धैर्याचे केवळ कौतुकच केले जाऊ शकेल – 1908च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (लंडन) जॉनीने अंतिम फेरीत स्नोवी बेकर या ऑस्ट्रेलियाई खेळाडूला पराभूत करून मध्यम वजनगटातील मुष्टियुद्धाचे विजेतेपद मिळविले होते !

लेखसंग्रह

फिरक्या थरथरन्‌ आणि नावाचा घोळ

Category:

 

…मुरलीदरनचे सात चेंडू ‘नो-बॉल’ ठरविण्यात आले. त्याच्या मारकतेला प्रतिस्पर्ध्यांनी केलेला हा पहिला सलाम होता! प्रथम 1996 आणि नंतर 1999मध्ये आंक्रिपने त्याची गोलंदाजीची शैली नियमांमध्ये बसत असल्याचे स्पष्ट केले. या वेळपावेतो त्याने ‘दूसरा’ टाकावयास प्रारंभ केलेला नव्हता. ‘दूसर्‍या’शिवायच आपल्या कंदुकाच्या फिरकलीलांवर फलंदाजाला थरथरविण्यास मुरली आता राजरोसपणे तयार झाला.

लेखसंग्रह

डॉनचा जन्म

Category:

 

…लहान असताना तो एकटाच यष्टीने गोल्फचा चेंडू पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या एका टाकीवर मारून सराव करीत असे असे ऑस्ट्रेलियातील लोकसाहित्य सांगते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने बोवराल शाळेकडून खेळताना पहिले शतक काढले. आपले काका जॉर्ज व्हॅटमॅन यांच्या नेतृत्वाखालील संघाचा खेळ पाहता-पाहता तो धावलेखकाचे काम करू लागला.

लेखसंग्रह

ऑलिंपिक क्रिकेट आणि निकालबदलू कसोटी

Category:

 

… आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ निकाल पुनःस्थापित केला.

लेखसंग्रह

जॉर्जला सोडा; नाहीतर खेळ खल्लास

Category:

 

सकाळी सकाळी ग्राऊन्समनने खेळपट्टीवरील आच्छादने काढली आणि तो सर्दच झाला…खेळपट्टी खणून ठेवण्यात आलेली होती जागोजागी. धक्का पण तो पडला ब्रिटिश. खेळपट्टी दुरुस्त करून खेळापुरती योग्य करविण्यास किती वेळ लागेल याचे गणित तो करू लागला. ते शक्य असल्याची जाणीव त्याला झाली पण…