सप्टेंबर २७ – ‘झडप्या’ ब्रेन्डन मॅक्कलम आणि हेमिंग्जचे ‘दाही’ बळी
Category:
लेखसंग्रहइंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे.
ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला.