नेपाळ
शहरे आणि गावे

नेपाळ

Category:

 

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदू बहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४१ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नाही. काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे.

नायजेरिया
शहरे आणि गावे

नायजेरिया

Category:

 

नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर्वात मोठे शहर आहे.

नॉर्वे
शहरे आणि गावे

नॉर्वे

Category:

 

नॉर्वेचे राजतंत्र (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

नौरू
शहरे आणि गावे

नौरू

Category:

 

नौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही.

न्यू झीलंड
शहरे आणि गावे

न्यू झीलंड

Category:

 

न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता.

निकाराग्वा
शहरे आणि गावे

निकाराग्वा

Category:

 

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा व पश्चिम गोलार्धातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात गरीब देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

नेदरलँड्स
शहरे आणि गावे

नेदरलँड्स

Category:

 

नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नामिबिया
शहरे आणि गावे

नामिबिया

Category:

 

नामिबियाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Namibia, जर्मन: Republik Namibia; आफ्रिकान्स: Republiek van Namibië) हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियाच्या उत्तरेला अँगोला व झांबिया, पूर्वेला बोत्स्वाना, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका हे देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.